Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळनाथ ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.



मंगरूळनाथ/प्रतिनिधी:-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा मंगरूळनाथ येथे दि. 18 ऑगस्ट रविवारी अकोला वाशीम जिल्ह्यातील ब्रह्माकुमारीज प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदीजी व ब्रह्माकुमारी सुमन दीदीजी अकोला यांच्या प्रमुख उपस्थितीत व

 मंगरूळनाथ ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सरिता दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली बहीण भावाच्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेल्या रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
 मंगरूळनाथ सेवा केंद्राच्या वतीने संचालिका सारिका दीदींनी अकोला येथून आलेल्या वरिष्ठ रुख्मिणी दीदी व सुमन दीदींचे स्वागत केले. सुमन दीदींनी ब्रह्माकुमारीज मुख्यालय माउंट अबू राजस्थान येथून मंगरूळनाथ वासियांसाठी आलेली विशेष राखी दाखवून परमात्म संदेश वाचून दाखविला आणि रक्षाबंधन सणाचे आध्यत्मिक महत्व सांगितले.विशेष अतिथी अकोला वाशीम ब्रह्माकुमारीज प्रमुख आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदीनी रक्षाबंधन निमित्त मार्गदर्शन केले.रक्षाबंधन या पावन पर्वावर आपल्या मनात दृढ संकल्पच्या धाग्यात ज्ञानाचे मोठी विनून पवित्रतेचा रत्न बनण्यासाठी शक्ती संकलन करण्यासाठी रक्षाबंधन उत्सव साजरा केला जातो. मनुष्य आत्म्याची परमात्म्याशी डोर घट्ट करण्याची स्मुर्ती देणारा हा पवित्र सण आहे. मनुष्य आपली आत्मिक स्मुर्ती काळानुरूप विसरला आहे ते आत्मिक भान जागृत करुन तमोप्रधान सृष्टी ला सतोप्रधान बनविण्याचे महान कार्य करण्यासाठी ईश्वरांनी सर्व ब्राह्मण परिवाराची निवड केली आहे त्या ध्येयाकडे वाटचाल करताना येणाऱ्या समस्याशी सामोरे जाताना सर्व निमित्त मनुष्य आत्म्याची सुरक्षा व्हावी यासाठी परमातम्याने बांधलेले आत्मिक स्नेहाचे बंधन म्हणजेच रक्षाबंधन.भाऊ बहिणीच्या लौकिक पवित्र नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी आणि आपली धार्मिक व अध्यात्मिक संस्कृतीचे जतन होण्यासाठी रक्षाबंधन सर्वत्र मोठया आनंदात साजरा केला जातो. 

परमात्म प्रेमाच्या बंधनात राहून आत्मिक स्मृतीचा तिलक लावून ज्ञान आणि शांतीची स्नेह भेट देऊन एकमेकांच्या प्रती सदभावना व्यक्त करीत रक्षाबंधन साजरा करण्याचे आवाहन रुख्मिणी दीदींनी केले. उपस्थित सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणीना दीदींनी राखी बांधून ईश्वरीय भेट दिली. रक्षाबंधन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्माकुमारी गौरी दीदीसह ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments