आज दि.१८ ऑगस्ट ला विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती जिल्हा वाशीम ची सह विचार सभा श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशीम येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर श्री.बाबुसिंगजी पवार काका यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनापती,नेताजी सुभाषचंद्र बोस व हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक साहेब, यांना विनम्र अभिवादन करून सभेची सुरवात करण्यात आली.
प्रथम बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती चे स्व. वामनराव मारुटकर, शाखा अध्यक्ष चिखली ता.रिसोड व स्व. मारोतराव शिवराम खडसे, रा. येवता बंदी ता. कारंजा यांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मौजे कोयाळी ता. रिसोड येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी गजानन शिरसाट यांचे दोन्ही चिरंजीव १) चि. मदन गजानन शिरसाट यांची पोलीस उप-निरीक्षक (PSI) पदी नुकतीच नियुक्ती झाली. तर दुसरा लहान भाऊ अनिल गजानन शिरसाट यांची चार्टर अकाउंट्स (C. A.) पदी नियुक्ती झाली. याबद्दल समिती च्या वतीने त्यांचे वडील श्री गजानन शिरसाट यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या सभेस समिती पदाधिकारी श्री.भावसिंगजी राठोड मा. पं. स. सभापती मानोरा, शिवदास पाटील ताठे, बाबुसिंगजी पवार काका,यांनी मनोगत व्यक्त केले, शेवटी समिती जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांनी सखोल अशी माहिती उपस्थितांना दिली.
लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागत आहे,तेव्हा वाशीम तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा शेवटी निर्वाणीचा इशारा की, आचार संहिता लागण्यापूर्वी शासनाने समिती शिष्टमंडळ समवेत बैठक आयोजित करुन विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय द्यावा. अन्यथा विदर्भात झालेल्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत वाशीम तथा विदर्भातील पिळलेला प्रकल्पग्रस्त शेतकरी केल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
सभेचे सुत्रसंचालन व आभार समिती पदाधिकारी मुख्तार खान पटेल यांनी मानले. सह विचार सभेस वाशीम जिल्हा पदाधिकारी,जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त गावातील मोठ्या प्रमाणात शाखा पदाधिकारी बंधू,भगिनी यांची अभूतपूर्व उपस्थिती होती.
0 Comments