Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन नेतृत्व,कार्य तत्पर शोध व बचाव कार्य पुरस्काराने जिवनरक्षक दिपक सदाफळे सन्मानित....


_जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांचे आपत्ती व्यवस्थापन आणी शोध व बचाव कार्य प्रेरणादायक_  भुवनेश्वरी एस मॅडम जिल्हाधिकारी वाशिम 
:- 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे जिल्हा प्रशासनाच्या आयोजित कार्यक्रमात मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर महाराष्ट्र चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांची टीम गेली 25 वर्षा पासुन सातत्याने आपत्ती व्यवस्थापन आणी शोध व बचाव कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणी जनजागृती चे काम निस्वार्थ पणे करत आले आहेत यामधुन संपुर्ण महाराष्ट्रात त्यांनी मानवनिर्मित नैसर्गिक अशा विविध आपात्कालीन घटनांमधून सहा हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचविले आहेत त्यांच्या जिवरक्षक सेवा, रुग्णसेवा,रस्ते अपघात सेवांसह सेवा सुरक्षा तत्परतेची दखल घेऊन दिपक सदाफळे आणी
 त्यांचे सहकारी यांना वाशिम जिल्हाधिकारी मा.भुवनेश्वरी एस मॅडम,वाशिम यांचे हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक मा.अनुज तारे सर, मुख्यकार्यकारी अधिकारी मा.वैभव वाघमारे सर, निवासी उप-जिल्हाधिकारी मा.विश्वनाथ घुगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाचे सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले अशी माहीती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments