Ticker

6/recent/ticker-posts

संभाजीनगरला प्रहार मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे,वाशिम संपर्क प्रमुख दत्ता महाराज



वाशिम  प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहा ही तालुक्यांतील पदाधिकारी, कर्यकर्त, हजारो दिव्यांग बांधवासह नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार 
वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता महाराज पागधने यांनी केले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्षतथाआमदार बच्चूभाऊ कडु यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ करून प्रतिमहिना ६ हजार रुपये करावा, विनाअट घरकुल देण्यात यावे, भूमिहिन दिव्यांगांना एक गुंठा जागा द्यावी, सरकारी जागेमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी,


यासह शेतकरी, शेतमजुरांच्या असे विविध मागण्यांसाठी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. सदर मोर्चा क्रांती चौक पासुन सुरवात होत असुन विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. तीन ही विधानसभेच्या मतदारसंघात लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चात आपल्या हक्कासाठी सामील होऊन एकजुटीने कार्य करू चला तर मग वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग, निराधार, शेतकरी, शेतमजूर आदी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता महाराज पागधने यांनी केले आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments