मंगरूळपीर स्टॅन्ड समोर वाशीम कारंजा महामार्ग या रोडला लागून महसूल विभागाने काही प्लॉट लिजवर दिलेले आहेत या राज्य महामार्गाच्या बाजूलाच अशोक नगर दलित वस्ती आहे येथील लिजची मुदत संपली असून महसूल विभागाने लीज धारकाकडून प्लॉट खाली करून घेतले नाही लीजच्या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम केले आहे हे अतिक्रमण तातडीने हटवावे अशा मागणी करिता अशोक नगर मधील नागरिक आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी तहसील समोर उपोषणास बसले आहे
नगरपरिषद मालमत्ता क्रमांक 645 मालमत्ता क्षेत्रफळ 400 चौरस फूट ही मालमत्ता बानुबाई चौधरी यांच्या नावाने नोंद होती आता नसीम जहा आवेज कर्णी अहमद यांना गैर कायदेशीर हस्तांतर करून त्यांच्या नावाची नगरपरिषदेला नोंद घेतली आहे. नशीमजहा अवेज अहमद यांनी व त्यांच्या मुलांनी या सिमेंटचे गोडाऊन बांधले आहे त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे सिमेंटचे वाहने लोड करताना दलित वस्तीतील लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे त्यामुळे शेजारी राहत असलेल्या दगडू जी इंगोले यांना कॅन्सर होऊन निधन झाले आहे .आणि छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरूच आहे. रस्त्यावर मोठमोठे ट्रक उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन रस्ता नीरुंद झाला आहे त्यामुळे लीजची मुदत संपलेल्या जागा खाली करून हस्तांतर करणाऱ्या प्लॉट धारका विरुद्ध कारवाई करावी आणि अनधिकृत बांधकाम केलेले सिमेंट गोडाऊन हटवण्यात यावे याकरिता तहसील कार्यालय मंगरूळपीर समोर अशोक नगर येथील ग्यानू भडांगे, नगरसेवक सचिन पवार , विनोद पाटील, राजू जयस्वाल, युवा सामाजिक कार्यकर्ते बजरंग इंगोले , यांच्यासह असंख्य नागरिक उपोषणास बसले आहेत. नसीम जहा आवेज कर्णी अहमद यांनी गैर कायदेशीर अतिक्रमण करून परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून तात्काळ अतिक्रमण काढण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
0 Comments