Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा (खुर्द )येथे वृक्ष रक्षा बंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न .

 
श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा (खुर्द )येथे राखी बनाआओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये वर्ग पाच ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून सहभाग घेऊन टाकाऊ वस्तु (विविध रंगि -बेरंगी धागे- दोरे ,मनी ,टिकली ,फुल, पान ,थर्माकोल ,धान्य )पासून टिकाऊ अशा सुंदर सुंदर राख्या बनवल्या.   
      संस्थेचे प्राचार्य तथा सचिव श्री मंगेश भाऊ धानोरकर यांनी या सर्व  विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व या हाताने बनवलेल्या राख्या वाया न घालवता पर्यावरण रक्षणासाठी या राख्या झाडांना बांधून झाडांचे रक्षण करावे.कारण झाडे वाचली तर पर्यावरणाचे रक्षण होईल आजच्या काळात अतोनात वृक्षतोड होत आहे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे त्यामुळे वृक्ष रक्षाबंधन करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या त्यानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व शिक्षक यांनी वृक्षाला राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. स्पर्धेचे चे आयोजन विद्यालयातील शिक्षक श्री सावके सर्व  श्नी भगत सर यांनी केले यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments