म्हणे आज मैञी दिवस! बर कोण आणला? कसा आणला? कुठून आणला? कधी आणला? कोणासाठी आणला? का आणला? का कुणास ठाऊक! खर म्हणजे हा "Friends ship day " foreigner, European words " पाश्चात्य संस्कृती! त्यांची "कड"! कुरापत! उगम! वैगरै वैगरै! त्या Friendships day चा मैञी दिन ( दिवस) झाला! बर झाला तर झाला! ठिक आहे! बर मग मैञी दिवस पाळायचा! त्या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, चला हे पण ठिक आहे. पाळा मैञी दिवस! द्या शुभेच्छा! चांगल आहे. पण मग मैञी तशी असली पाहिजे! ती तशी ठिकवली पण पाहीजे! जपली सुध्दा पाहिजे! सांभाळली पण पाहीजे! एका साहित्यिकान पण म्हटल आहे. " दोस्ती समान गुण वालो की ही शोभती और निभती है"! बर मग मैञी कशी कशी असली पाहिजे! तर पुराणिक, धार्मिक ग्रंथ, इतिहास यातील अनेक उदाहरण देता येईल, दाखले देता येईल, जशी रामायण काळातील प्रभु रामचंद्र व वानर राज सुग्रीव याची मैञी! ज्याने आपल राजपाठ, पत्नी सर्व भोगविलास सोडून मैञी साठी! आपली सेना घेऊन जिवाची पर्वा न करता दिग्विजयी महापराक्रमी लंकापती रावण याचे सोबत युध्द केले. ती मैञी ‼ दुसरी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण व सुदामा याची, जी बालपणापासून ते म्हातारपणा पर्यन्त सांभाळली! भगवान श्रीकृष्ण आपल्या मिञाला सुदामाला भेटायला गावी गेले! एक सर्व गुण संपन्न,बलशाली, शक्तीशाली,धनवान राजा! एका अत्यंत गरीब, दारिद्र्य जिवन जगत असलेल्या आपला मित्र सुदामा च्या घरी जाऊन त्याचे पोहे खाल्ले ( सुदामाचे पोहे प्रसिध्द आहेत) आणी मग भगवान श्रीकृष्ण सुदामा मी आता तुझा ऋणी झालो! माग आता तुला काय मागायच ते! तु मला माझ राज्य ही मागीतल तर तुला देऊन टाकेन! कारण मला तुझे ऋण फेडायचे आहे. ऋणातून मुक्त व्हायचे आहे.पण सुदामा नी राज्य मागीतल नाही! ऐश्वर्य, ऐश्वो आराम मागीतला नाही! तर मागीतल काय ‼ फक्त आपली निखळ मैञी ‼ मैञीत आठवण ‼ आणी आपली कृपादृष्टी ‼ पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या मैञीला जागत सुदामा ला दुर्धर आजारातून मुक्त केले‼ शिवाय त्याला एक चांगले आयुष्य, चांगले जीवन, चांगला संसार करता येईल अशी व्यवस्था केली‼ आणी पुन्हा लवकर भेटण्याचे वचन ही दिले‼ती मैञी‼
तिसरी मैञी म्हणजे शिवकालीन जी धाकले छञपती धर्मवीर संभाजी राजे व कवी कलश याची! जेव्हा छञपती संभाजी राजे याना धोक्यानी, कपट, छलानी, षडयंत्र व फितुर, गद्दार याच्या मदतीन औरंगजेबाच्या आदेशानुसार मुगल सैनिकानी दगा करून संभाजी राजे व कवी याना जेरबंद केलं.तेव्हा कवी कलश पळून जाऊ शकले असते! छञपती संभाजी राजे नी सर्वाना आदेश पण दिले. त्या अगोदर कवी कलशानी छञपती संभाजी राजे ना तुम्ही निघा, गडावर पोहचा, आम्ही गनिमा ना सांभाळतो, किल्ला लढवतो. राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहीजे! पण राजे आपल्या मावळया ना, सवगळ्या ना, मिञाना मृत्युच्या समोर सोडतील तर मग काय ‼ राजे पकडल्या गेले, सोबत कवी कलश पण! आणी मग 14 दिवस शंभु राजा सोबत अन्विक,असह्य, अत्याचार सहन करून बलिदान दिल पण मैञी सांभाळली‼
ती मैञी‼ मैञी त्याला म्हणतात! मिञ ही त्याला म्हणतात! सांभाळण आणी टिकवण ही त्याला म्हणतात! त्यानी ना जात पाहीली,ना धर्म पाहीला! ना गरीबी पाहीली,ना श्रीमंती पाहीली! ना गट पाहीले,ना पक्ष पाहीला! फक्त आणी फक्त मैञी केली, आणी ती सांभाळली,टिकवली,निभावली! पण आता हल्ली ची मैञी कशी झाली? स्वार्थी,मतलबी,धंदेवाईक, कामचलाऊ,मोका प्रस्ती! टाईमपास! पैसा पावून, व्यवसाय पावून, नौकरी पावून, पद पावून, दर्जा पावून, बरोबरी पावून, (लेवल पावून) एवढंच काय ‼ तर "पक्ष" पावून‼अरे रे रे!! हे तर भलताच ट्रेड आला बुवा! आता! म्हणजे आता मैञी ही स्वभाव, गुण,विचार,आचार ही पावून होत नाही. तर वरील अवगुण पावून व्हाय लागली! म्हणून मैञी चा पार पचका झाला! आता मैञी कशी होते पहा! श्रीमंताची- श्रीमंता सोबत, व्यवसायीकाची-व्यवसायका सोबत, अधिका-याची-अधिकारी सोबत, कर्मचारी-कर्मचारी सोबत, ग्राम सचिवांची- सचिवा सोबत, पटवारीची- पटवारी सोबत, शिक्षकाची- शिक्षका सोबत, पदाधिकाऱ्यांची- पदाधिकाऱ्यांसोबत, कृषी सहाय्यकाची- कृषी सहाय्यका सोबत, लाईनमन ची लाईनमन सोबत, चपराशीची- चपराशी सोबत, ड्रायव्हर ची- ड्रायव्हर सोबत, मालकाची- मालका सोबत, तर गडयाची-गडया सोबत, शेतकऱ्यांची- शेतकऱ्या सोबत, मजुरांची- मजुरा सोबत, गरिबांची- गरीबा सोबत, असे अनेक उदाहरण देता येईल भाऊ! एकुणच काय ‼ तर मैञी ही आता फक्त आणी फक्त पैसा, पद, प्रतिष्ठा, पक्ष, हि चार " प " पावून होत आहे. शुभेच्छा पण देताना आता वाढदिवस असो! पद असो, व्यवसाय असो, शासकीय नौकरी लागली असेल, पण तो आपल्या पक्षाचा असेल तर आणी तरच त्याला शुभेच्छा दिल्या जातात! म्हणून हल्लीची मैञी पक्षपाती झाली. नव्हे तिला पक्षीय स्वरूप दिल जात आहे. मैञी पावून, सावून, पारखून, निरखून केली जाते. मैञीत भेदभाव होत आहे. निखळ मैञी कुठ राहली? मैञीत निर्मळता व पावित्र्य कुठ राहले? एकीकडे मैञी करताना तो आपल्या पक्षाचा आहे का? पक्षाचा पदाधिकारी आहे का? पक्षाचा कार्यकर्ता आहे का? किमान पक्षाचा मतदार आहे का? पक्षाचा, आपल्या नेत्याचा समर्थक तरी आहे का? असेल तरच मैञी केली जाते! नाहीतर कित्येक वर्ष जुनी असलेली मैञी सुध्दा पक्षांसाठी, पक्षाच्या प्रमुखासाठी, अध्यक्षांसाठी, नेतृत्वासाठी एका झटक्यात तोडली जाते. विसरली जाते. पक्षासाठी, आपल्या नेत्यांसाठी मैञीला मूठमाती देणारे अनेक दुर्जन हल्लीच्या काळात गल्लोगल्ली तयार झालेत. हे सर्वात मोठ दुर्दैव! मैञीला पक्षपाताच गालबोट लागल! मैञीला उच्च नीच पणाच गालबोट लागल! कित्येक दिवस नव्हे, कित्येक महीने नव्हे कित्येक वर्ष सोबत राहून मिञ असणारे फक्त आणी फक्त आपल्या पक्षांसाठी पक्ष नेतृत्वासाठी मैञी तोडणारे अनेक महाभाग आहेत. ज्या मुळे मैञी कलंकित झाली आहे. मिञ असून ही जर तो पक्षाचा असेल तरच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. पक्षाचा असेल तरच त्याला लग्न पञिका देऊन आमंत्रित केल जात आहे.पक्षाचा असेल तरच त्याला धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात बोलावल जात! अन्यथा नाही. बर यात पण प्रचंड मोठा भेदभाव दिसून येत आहे,ते म्हणजे समोरचा माणूस जर श्रीमंत असेल तर मग मात्र पक्ष बाजुला राहतो. मग मैञी उफाळून येते. जर समोरचा माणूस गरीब असेल तर मैञीत पक्ष आडवा येतो. सांगायच म्हणजेच मैञी ही आपल्या सोईनुसार केली जाते. सोईनुसार चालवली जाते.सोईनुसार सांभाळली जाते. सोईनुसार टिकवली जाते. आणी सोईनुसारच वाढवली व वापरली जाते. खर सांगायच म्हणजेच आजची मैञी ही संधी साधू मैञी झाली आहे.गरज पडली की मैञी करायची! गरज संपली की मैञी संपली! गरजेनुसार मैञी व गरजेनुसार मिञाचा वापर ही फॅशन झाली आहे.सोशल मिडीयावर जसे फेसबुक, व्हाट्सअप, इस्टाग्राम वर पक्ष पावून, दुर्बिण ने पावून मैञी विनंती पाठवल्या जातात. यदा कदा आपल्या समूहात जोडलेला मिञ जर आपल्या पक्षाच्या विचाराचा नसला,पक्षाचे ध्येय धोरण पटले नाही.नेतृत्व मान्य नसले, पक्षाच्या नेत्याच्या विरोधात विधायक मार्गाने, संवैधानिक मार्गाने एखादी पोस्ट टाकली, टिका टिप्पणी केली तर क्षणाचा ही विचार न करता, कैक वर्ष जुन्या मैञी चा विचार न करता त्याला झटक्यात, ताबडतोब, गृप अडमिन ची इच्छा नसेल तरी कुणाच्या तरी सांगण्यावरून गृप(समूहातून ) मधून बाहेर काढून टाकण्यात येते. रिमोह केल्या जाते. एवढी पक्षपाती,तकलादू मैञी झाली आहे. म्हणूनच म्हणतो एका जिल्ह्यात, तालुक्यात, एका गावात राहणा-या नव्हे नेहमी तोंडावर तोड, एकमेकांशी संबंध असणा-या,संकटात धाऊन येऊ शकेल,आवाज दिला तर ओ देईल अशा मिञाला कित्येक कोस दुर असलेल्या, आपल्याला ओळखत ही नसलेल्या व्यक्तींसाठी दुखावणे, दुर लोटणे, दुरावा निर्माण करणे कितपत योग्य ठरेल! अपशब्द वापरून, मैञीत कटुता निर्माण होईल अस वागण याला मैञी म्हणता येईल का? अशा व्यक्तींना खरोखरच मैञी दिवसाच्या शुभेच्छा देण्याचा नैतिक अधिकार आहे का??? असो मैञी दिना निमित्तान एवढंच! क्रमश:
लेखन-अण्णाभाऊ चौधरी चेहेल पो.ता.मंगरूळनाथ. जि.वाशिम
0 Comments