मंगरूळपीर - तालुका शिव सेनेचे माजी उपतालुका प्रमुख तथा माजी तालुका संघटक अण्णाभाऊ चौधरी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चन्द्रशेखरजी बावनकुळे याचे हस्ते शिव सेनेतुन भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश केला. वयाच्या 18 व्या वर्षी विद्यार्थी दशेत असताना हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे याचे ज्वलंत,आक्रमक, धगधगते हिंदुत्ववादी विचार ऐकून व त्या विचाराने प्रेरित होऊन शिवसैनिक झालेल्या अण्णाभाऊ चौधरी यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत, शैक्षणिक नुकसान केले. तसेच शिव सेनेचे कार्य करत असताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहा साठी रोजगार किंवा व्यवसाया कडे सुध्दा लक्ष देऊ शकले नाही.त्या मुळे आर्थिक नुकसान सुध्दा झाले. पण शिव सैनिक म्हणून काम करत असताना झपाटल्या सारखा एका ध्येयाने, फक्त आणी फक्त धर्म व हिंदुत्व याचा वसा व शिवसेनाप्रमुखाच्या आदर्श विचाराची भगवी पताका घेऊन राजकीय प्रवासाला सुरुवात केली. एक शिव सैनिक म्हणून सुरू केलेला राजकीय प्रवास कासव गतीने सुरू होता. वाटेत अनेक अडथळे आली. आव्हाने आली. संकटे पण आली. पण न डगमगता त्यावर मात करून शिव सैनिक म्हणून प्रवास सुरूच होता. त्यानंतर शिव सैनिक म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत गावातील सहकारी शिव सैनिकानी शाखाप्रमुख म्हणून निवड केली. त्यानंतर चेहेल या गावचा शाखाप्रमुख म्हणून शिव सेनेचे काम करत असतांना गावातील गोर गरीब, दिन दुबळे, रंजले गांजले याची सेवा ही सुरूच होती.त्यावेळेस चे शिव सेना तालुका प्रमुख राजेश पाटील याचे नेतृत्वात 1994 ते 1999 पर्यंत काम केले. त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडली. घरावर तुळशीपत्र ठेवून तालुक्यात शिव सेनेचे काम केले. त्यानंतर गाव पातळीवर काम करताना सर्कल मध्ये काम करत राहीलो. 1999 च्या विधान सभा निवडणूकी नंतर शिव सेनेच्या तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी भिमराव पाटील सुर्वे याचे कडे आली. त्याचे नेतृत्वात काम करत असताना अण्णाभाऊ चौधरी याच शिव सेनेतील काम बघून त्यांनी उप सर्कल प्रमुख म्हणून 2000 साली नियुक्ती केली. कोठारी उप सर्कल प्रमुख झालेवर जबाबदारी वाढली, वाढलेली जबाबदारी खांदेवर घेऊन आणखी जोमाने काम सुरू केले. 2002 ला ग्राम पंचायत निवडणूक लढवली. एका गावाच्या जबाबदारी नंतर आठ गावाची जबाबदारी आली, तसेच काम पण वाढले. आव्हाने वाढली, संकट वाढली. हे सगळं घेऊन शिव सेनेतील प्रवास मात्र चालूच होता.शिक्षण पुर्ण बुडाल होत. कुटुंबांकडे लक्ष नव्हत. लढवली.पण पहाडा सारखे वडील मागे उभे असल्यामुळे चार पैसे कमावून आणावे लागले नाही. खर्चाला पण पैसे वडील द्यायचे. तु कमावत नाही, राजकारण करत, चार पैसे कमावत नाही, खर्चाला घरून द्यावे लागतात, म्हणून कधी रागावले नाही.कधी टोकल नाही. कधी नकार दिला नाही. पैसे मागीतले तेव्हा दिले. नेहमीच अण्णाभाऊ चौधरी याचे मागे वडील खंबीर उभे असल्यामुळेच ते शिव सेनेत पुर्ण वेळ काम करू शकले. दिवस, महीने वर्ष जात होती. अण्णाभाऊ चौधरी याच शिव सेनेत काम सुरूच होत. 2007/08 ला भिमराव पाटील सुर्वे यानी शिव सेना सोडल्या नंतर मंगरूळनाथ शिव सेनेच्या तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी अनिल पाटील राऊत याचे कडे आली. अण्णाभाऊ चौधरी याना शिव सेनेत काम करत 14 वर्ष झाली होती. म्हणजेच पुर्ण एक तप झाल होत. अण्णाभाऊ चौधरी याच्या कामाचा झपाटा वाढतच होता. कोठारी उप सर्कल बरोबरच कवठळ सर्कल मध्ये काम सुरु केल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिव सेनेच काम सुरू होत. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत होती. भाजप इकड जम बसवत होता. युती असल्यामुळेच भाजप च सुध्दा काम करत होते. अण्णाभाऊ चौधरी याचे कामाचा झपाटा पाहून अनिल पाटील राऊत यांनी कवठळ सर्कल प्रमुख नियुक्ती केली. त्याच बरोबर 2007 ला ग्राम पंचायत ला पॅनल उभे करून स्वतः सह तिन सदस्य निवडून आणले, व ग्राम पंचायत चा सरपंच शिव सेनेचा करून ग्राम पंचायत वर भगवा फडकवला. कामाचा व्याप व आलेख वाढतच होता. एक एक नवीन जबाबदारी खांदेवर पडत होती. ती तेवढ्याच प्रामाणिक पणे व यशस्वी पार पाडण्यात कस लागत होता.2012 ला ग्राम पंचायत ला पॅनल उभे करून 9 पैकी 6 सदस्य निवडून आणले. अण्णाभाऊ चौधरी याच्या कामाची पावती जनतेन मत पेटीत भरभरून मत देऊन प्रेम व्यक्त करत होते. गावातील गोरगरीब जनता प्रचंड प्रमाणात मागे उभे राहून, प्रेम व आशीर्वाद देत होती. शिव सेनेत काम सुरूच होत. त्याच बरोबर जनप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा ही सुरूच होती. त्याच कामाची पावती म्हणून जनतेने 2017 ला ग्राम पंचायत ला अण्णाभाऊ चौधरी याचे विरोधात उमेदवार उभा न करता, अविरोध निवडून दिले. एक प्रचंड विश्वास दाखवून जबाबदारी वाढवली. ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी पायाला भवरा, तोंडात साखर, वेड लागल्या सारख काम आणी कामाच!!! आणी याच कामाची दखल घेऊन 2019 शिव सेनेचे नवनिर्वाचित मंगरूळनाथ तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांनी एक नव्हे तब्बल दोन दोन म्हणजेच मंगरूळनाथ उपतालुका प्रमुख व मंगरूळनाथ तालुका संघटक या पदावर नियुक्ती करून प्रचंड मोठा विश्वास दाखवून जबाबदारी वाढवली. ती जबाबदारी सुध्दा प्रामाणिक पणे निभावत, पुर्ण करून यशस्वी करण्यासाठी जिवाच रान करत शिव सेनेत काम केले. अण्णाभाऊ चौधरी यांनी शिव सेनेत काम करत असतांना कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही.कुठलेही पद मागीतले नाही, तर वरिष्ठांनी कामाची दखल घेऊन त्यांना वेळो वेळी कामा नुसार पद दिले, आणी त्या पदाला पुरेपूर न्याय देण्यासाठी जिवाचे रान करून, राञीचा दिवस करून अण्णाभाऊ चौधरी यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरविला. शिव सेनेत काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. फक्त हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचे विचार, याचे देशप्रेम, राष्ट्रभक्ती, ज्वलंत हिंदुत्व, आक्रमक पणा, मराठी बाणा, धगधगता निखारा याला भारून शिव सैनिक झालेले अण्णाभाऊ चौधरी हे जेव्हा उध्दव ठाकरे यानी नोव्हेंबर 2019 च्या विधान सभा निकालानंतर बाळासाहेब याचे हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवून, हिंदुत्वाला तिलांजली देऊन काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार बनविल्यापासून प्रचंड नाराज झाले, दुःखी झाले उद्विग्न झाले. अस्वस्थ झाले. ज्या विचाराने, ध्येयाने, भूमिकेमुळे आपण शिव सैनिक झालो, तो विचारच शिव सेनेत राहीला नसेल तर शिव सैनिक म्हणून का रहायचंय, का त्या हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचे विचारापासून दुर गेलेल्या, व आयुष्यभर टोकाचा विरोध केलेल्या काँग्रेस चे गुलाम व्हायच, त्याचा प्रचार करायचा या विचारान मन खात होत. तरीपण मन मारून शिव सेनेत काम सुरूच होत. उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंञी झालेत. शिव भोजन थाली योजना शिव सेनेची, केंद्र काँग्रेस, राष्ट्रवादी वाल्यांना ‼शिव सैनिकानी झेडे लावायचे! सतरंज्या उचलायच्या! असे अनेक न पटणारे निर्णय उध्दव ठाकरे सरकार घेत होती. म्हणून शरीरान शिव सेनेत राहील्या पेक्षा घरी बसलेल बर म्हणून अण्णाभाऊ चौधरी यांनी 2022 ला आपल्या कडे असलेल्या दोन्ही पद उपतालुका प्रमुख, व तालुका संघटक या पदाचा रितसर राजीनामा मंगरूळनाथ तालुकाप्रमुख रामदास सुर्वे व जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचेकडे दिला.व आपल्याला जबाबदारी तून मुक्त केले.तेव्हापासून गेली अडीच वर्ष अण्णाभाऊ चौधरी हे तटस्थ होते. पण त्याचे भारतीय जनता पार्टीतील अनेक जवळचे जिवाभावाचे मिञ, स्नेही मंडळींकडून जुन्या युतीतील सहका-याकडून भाजप मध्ये प्रवेश करावा असा आग्रह असायचा! तगादा लावायचे! नेहमी म्हणायचे! तुम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आहात! भाजप मध्ये या! गेली अडीच वर्ष अण्णाभाऊ चौधरी या त्या कारणाने वेळ पुढे ढकलत होते, अडीच वर्ष कोणत्याही पक्षात प्रवेश न करता तटस्थ राहले.पण अखेर तो दिवस आज उजाडला!नव्हे सुनील मालपाणी व इतर सहकारी यांनी योग ही जुळून आला. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे हे भाजप शहर अध्यक्ष सतीश हिवरकर याचे घरी आले असता! सुनील मालपाणी, विनोद जाधव, सतीश हिवरकर, श्याम खोडे, हरिदास ठाकरे, विरेंद्र ठाकूर सर, संजय राऊत, गणेश नाकाडे, राहुल अढाव, गजानन अवगण, अशा असंख्य सहका-या समक्ष आज भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश केला व नवीन इनिंग ला, कार्याला सुरुवात केली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments