Ticker

6/recent/ticker-posts

श्री घृष्णेश्वर (कुंकूमेश्वर) महात्म्य बारावे जोतिर्लिंग वेरूळ या पोथीचा प्रकाशन सोहळा संपन्न


श्री क्षेत्र वेरूळ : संत कवी ह. भ. प. श्री. हरिभाऊ शंकरराव शिंदे, 
दिग्रस जिल्हा यवतमाळ. रचित "श्री घृष्णेश्वर (कुंकूमेश्वर) महात्म्य" या ओवीबद्ध पोथीचे प्रकाशन प्रथम श्रावण सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाले. याप्रसंगी घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. सुनील जोशी, कार्याकारी विश्वस्त श्री. योगेश विटखेडे, विश्वस्त श्री. चंद्रशेखर शेवाळे, विश्वस्त श्री. रवींद्र पुराणिक, विश्वस्त श्री कुणाल दांडगे, विश्वस्त श्रीमती रेखाताई ठाकरे, व्यवस्थापक श्री. संजय जोशी व तसेच आकाश ठाकरे, श्री अनमोल कुलकर्णी ठाणेदार महुरे पोलिस ठाणे खुलताबाद, सौ. चन्द्रकलाताई शिंदे, प्रा.डॉ. अनंत शिंदे, प्रा. सौ. अनुराधा शिंदे अनुराग आणि अनंन्य शिंदे हे उपस्थित होते. या पोथी मध्ये महादेवास घृष्णेश्वर हे नाव कसे पडले याचे सविस्तर वर्णन केले आहे. तसेच याच घृष्णेश्वरास कुंकुमेश्वर का म्हणतात याचे वर्णन या महात्म्यात केलेले आहे. लेखकाने या धावपळीच्या जीवनात मोठ मोठे ग्रंथ वाचण्यास वेळ मिळत नसल्यामुळे कमीत कमी वेळेत सर्व भावार्थ लक्षात यावा या उ‌द्देशाने अगदी सरळ सोप्या भाषेत ओव्याची रचना केलेली आहे. श्री घृष्णेश्वर महात्म्य लिहिण्याकरिता श्री संजय वैद्य वेरूळ यांनी विनंती केली  होती 
ह.भ. प. संतकवि, श्री हरीभाऊ शिंदे हे विदर्भातील शीघ्रकवि आणि अध्यात्मिक लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी महाकाली महात्म्य चंद्रपूर, श्री. चिंतामणी गणेश महात्म्य, कळंब जि. यवतमाळ, स्वयंभू श्री. वटसिद्ध गणेश स्तोत्र व राजयोगी श्री. नरहरीनाथ महाराज स्तोत्र, देउळगाव राजा जि. बुलढाणा, श्री. सप्तश्रृंगी माता व चतुश्रृंगी माता महात्म्य, पुणे, श्री. रेणुका देवी महात्म्य माहूरगड जि. नांदेड, श्री. वासवी कन्यका परमेश्वरी स्तोत्र पेनुगोंडा आन्द्रप्रदेश, श्री. गणेश स्तोत्र, टेकडी गणपती नागपूर, संत सेवालाल महाराज स्तोत्र, पोहरादेवी जि. वाशीम, संत अच्युत महाराज गुस्म्हात्म्य शेंदुर्जना बाजार जि. अमरावती, श्री. कानिफनाथ स्तोत्र, वाई, जि. वाशीम, श्री. घंटीबाबा लीलामृत दिग्रस.जि यवतमाळ, श्री. ब्रम्हानंद महाराज स्तोत्र, दिग्रस जि. यवतमाळ, श्री. दिगंबर जैन आदिनाथ स्तोत्र दिग्रस, जि. यवतमाळ. श्री. हरिसा गुरुजी स्तोत्र, तळेगाव ता. दारव्हा जि. यवतमाळ, श्री. बालाजी स्तोत्र, वाशीम ईत्यादि. आज पावेतो त्यानी ४६ (३८ ओवीबद्ध स्तोत्र (ग्रंथ) आणि ८ इतर) लिहले आहे. भगवत गीतेचे भाषांतर, अनेक कविता, शृंगार गीते, हिंदी गीते, वन्हाडी गीते, भावगीते, पोवाडे, लावण्या, बंजारा गीते, १०८ नामावली, अष्टके, भूपाळी, गौळण, आरती संग्रह, आधुनिक पसायदान इत्यादी लिहिले असून अध्यात्मिक लिखाण विपुल प्रमाणात केले आहे. महाकाली स्तवन हे नेहा राजपाल यांनी गायीले असून ते आकाशवाणी पुणे आणि U Tube वर उपलब्ध आहे तर रेणुका माता भूपाळी उत्तरा केळकर आणि आधुनिक पसायदान प्रज्ञा अन्नम यांनी गायीले आहे.
ह.भ. प. श्री. हरीभाऊ शिंदे यांच्या आध्यत्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना १. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार २. नवोपक्रम जिल्हा प्रथम पुरस्कार ३. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार ४. विष्णुदास काव्य पुरस्कार ५. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ६. लोकमत पुरस्कार ७. मल मानकर पुरस्कार मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments