Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्याशी निगडित समस्यांबाबत तळेगाव गावातील PHC अंतर्गत मार्गदर्शन


तळेगाव गावातील PHC अंतर्गत येणाऱ्या आशा कार्यकर्ता यांच्या करिता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याला आशा गटप्रवर्तक मा. सुवर्णा इंगळे मॅडम उपस्थित होत्या. मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून समुपदेशक उज्वला वैद्य मॅडम, सामाजिक कार्यकर्ता वसुमती ढवळे मॅडम उपस्थित होत्या 

       किशोरवयात पदार्पण केल्यानंतर मुलींना शारीरिक, भावनिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. हे बदल नैसर्गिक आहेत मात्र नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी अनभिज्ञता असते. समुपदेशक उज्वला वैद्य यांनी मासिकपाळी बाबतचे समज गैरसमज, शारीरिक भावनिक व मानसिक बदल, आरोग्याशी निगडित समस्यांबाबत मार्गदर्शन केले तसेच मासिकपाळीची २८ दिवसांची सायकल समजावून सांगण्यात आली.
       सामाजिक कार्यकर्ता वसुमती ढवळे यांनी मासिकपाळीत महिलांना दिली जाणारी वागणूक चुकीची आहे, बदल गरजेचे आहे, महिलांमध्ये मैत्रीचे नाते तयार होणं गरजेचे आहे याविषयी माहिती दिली 
       मासिकपाळी बाबतचे गैरसमज दूर व्हावेत हा मेळावा घेण्यामागचा उद्देश आहे .

Post a Comment

0 Comments