Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभेला बाद केला वंचितचा उमेदवार ‼ महणून देवळे झाले उबाठाचे प्रबळ दावेदार ‼


 वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे.कोणत्या स्तराला गेले आहे.आमदार होण्यासाठी कोण किती पातळी सोडत आहेत. काय करत आहेत. जे सक्रिय राजकारणात आहेत. ज्याना राजकारणाचा अभ्यास आहे.ज्याच वाचन चांगल आहे. कदाचित त्याच्या आल असेल, नाहीतर येईल. पण जे सर्वसामान्य नागरिक आहेत. सर्वसामान्य माणूस आहे.सर्वसामान्य मतदार आहे. राजकारणात सक्रिय नाहीत. अशा साध्या सरळ माणसाच्या लक्षात कधीच येणार नाही, येऊ शकत नाही.
                          ते म्हणजे  लोकसभेला बाद झाला वंचित उमेदवार ‼  देवळे कसे झाले उबाठा चे प्रबळ दावेदार* ‼ असा प्रश्न पडणे साहजिक आहे,तर बंधुनो गोष्ट अशी आज वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघात महाविकास आघाडी म्हणजेच उबाठा कडून जे काही इच्छुक उमेदवार आहेत. त्यात सर्वात आघाडीवर हा उपरा आहे. आता इच्छुक कोण कोण आहेत. दोन वेळा विधान सभा लढलेले थोडक्यात आमदार होता होता राहिलेले निलेश पेंढारकर, राजाभैयया पवार, माजी प.स.सदस्य व वि‌द्यमान जि.प. सदस्य सचिन डोफेकर  हे झाले उबाठाचे खरे  निष्ठावंत, कडवट कट्टर शिव सैनिक  हे दावेदार असण  नैसर्गिक, व नैतिक  सुध्दा आहे. यांचा उबाठा चे उमेदवारीवर दावा करण योग्य व तेवढच रास्त सुध्दा आहे.याचं शिव सेनेत काम आहे, योगदान  आहे. बलिदान  आहे.व  त्याग  सुध्दा आहे.आणी या तिघा पैकी कुणालाही उबाठाची उमेदवारी मिळाली (तशी ती मिळणार नाही अशीच शक्यता जास्त) एक मात्र तेवढच खर आहे, सर्व सामान्य शिव सैनिक  तन मन धन व घरची भाकर  खाऊन प्रचार करतील. व वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघात उबाठा चा उमेदवार विजयी करण्याचा यशस्वी  प्रयत्न करतील. वरील पैकी कोणालाही उमेदवारी मिळाल्यास ते  सर्वसामान्य शिवसैनिकांचे उमेदवार  ठरतील हे ही तेवढच खर!  अन्यथा ....
पण राजकीय पटलावर वेगळ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कोण कुठले  रमेश जाधव  उबाठाची उमेदवारी मागत आहेत. त्याच योगदान काय? तर म्हणे ते मुळचे वाशीम चे आहेत. बर आता कुठ कल्याणला! ही त्याची योग्यता व पाञता! म्हणून दावेदार! 
 दुसरे नाशीकला कंञाटदार असलेले ईजि.  राजु मानमोठे हे पण दावेदार! आता यांनी ईजिनिअर म्हणून कंञाटदारीतून भरपूर धन जमा करून ठेवल असेल, आणी आता आमदार व्हायचे स्वप्न पडत असतील. पण या मानमोठे चा (ख-या निष्ठावंत शिवसैनिकात) मान किती? आणी पक्ष संघटनेत मोठे किती? हाही प्रश्नच? पण तरीदेखील याचे मतदार संघात पोस्टर्स बॅनर्स लागतात. पदाधिकाऱ्यांच समर्थन पण मिळत. याला काय म्हणायच? फक्त  लक्ष्मी दर्शन  नाहीतर आजपर्यंत ज्याच नाव मतदार संघात कोणीही कधीही उडत उडत ऐकल नाही. तो व्यक्ती निवडणुकीच्या तोंडावर एकदम चर्चेत येतो! दावेदार होतो! याला काय म्हणायच? हे कशाचे लक्षण आहेत? कोणाची  कृपा आहे? फक्त आणी फक्त लक्ष्मीची  !!
नाहीतर काय? हे असे दावेदार म्हणजे पावसाळ्यात जशा  छञी  उगवतात तशा निवडणूक आली की! उमेदवार बाहेर येतात. तस झाल!
याना निवडणूक आली की मतदार संघात  पोस्टर्स बॅनर्स लावून कोणाच्या वाढदिवसाच्या, कोणाच्या नियुक्तीच्या, वास्तु शाती, गृहप्रवेश, लग्न, निवड वैगेरे वैगेरे च्या शुभेच्छा!  अभिनंदन कराव लागत. नाहीतर प्रसिध्दी कशी होईल? मतदार संघात चर्चा कशी होईल? कारण हे महाशय पाच वर्ष कोणाच्याही संपर्कात नसतात, कोणाशीही याचा कवडीचा ही संबध नसतो. फक्त लक्ष्मी दर्शन करून हे महाशय मतदार संघात वातावरण तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. 
                 आता हेच  मानमोठे ज्याचा ना मतदार संघात मान आहे! ना हे शिव सैनिकात मोठे आहेत. पण तरीदेखील हे महाशय उबाठा ची विधान सभेची उमेदवारी साठी क्रमांक  दोन चे दावेदार  आहेत. 
आहे ना आश्चर्य! पण हे वास्तव आहे.सत्य आहे. नाकारून चालणार नाही. कटू आहे पण सत्य आहे. जे सर्वसामान्य नागरिक,माणूस, शिव सैनिक याचे लवकर लक्षात येणार नाहीच!
आज रोजी वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघात महाविकास आघाडीत असलेला उबाठाचे क्रमांक एकचे प्रबळ दावेदार आहेत मागील विधान सभा निवडणूकीत वंचित चे उमेदवार असलेले डॉ.  देवळे अनेकांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसला असेल, पण काहींना माञ आश्चर्याचा सुखद!  कारण बहुतेकांना हे आवडणार नाही, पचणार नाही, आणी सहन ही होणार नाही, पण कमी का असेना त्याना डॉ. देवळे  च उमेदवार हवेत.ते संख्येने कमी असतील पण ताकदवर  आहेत. पदाधिकारी आहेत. पैशावाले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य माणूस, मतदार व शिव सैनिकाना ते  गृहित धरत आहेत. त्याचं गृहीत धरण साहजिकच आहे.कारण वरिष्ठांना हे पक्क माहीत आहे.शिव सैनिक हा भावनाप्रधान असतो. तो वेगळा निर्णय घेऊ शकत नाही.नव्हे तशी धमक त्याच्यात नसते. उमेदवारी जाहीर होईपर्यंत पर्यंत तो  माकड  उड्या मारतो. नंतर मात्र बंदराने काठी हातात घेतली की सगळी माकड एका झाडावर! त्यामुळे निष्ठावंत वैगेरे  शिव सैनिकांच्या निष्ठेला ते फारशी  भिक घालत नाहीत. हा इतिहास आहे.बर असो! 
आपला  मुळ विषय डॉ. देवळे उबाठा चे क्रमांक एक चे तेही प्रबळ दावेदार कसे? तर याला खुप जुना इतिहास आहे एक म्हणजे मागील निवडणुकीत ऐन वेळेवर जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी मंञी सुभाषराव ठाकरे यांनी लखन मालीक  याना केलेली मदत डॉ. देवळे याच्या फारच जिव्हारी लागली! हाता तोंडाशी आलेली आमदारकी एका रात्रीत साहेबाच्या आदेशान पार धुळीस मिळाली. त्याचा त्याना प्रचंड राग आला! आणी तेव्हापासून ते आपला 😡 राग: वेळ मिळेल तेव्हा जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे व्यक्त करू लागले. मग ते आसेगाव जि. प. ची निवडणूक असो त्यात चंद्रकात ठाकरे याचे याचे विरोधात एडी चोटी चा जोर लावून तन मन  धन  लावून केलेला अपयशी प्रचार! त्यानंतर मंगरूळनाथ खरेदी विक्री संघ, मंगरूळनाथ जिनिंग प्रेसिंग, आणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सुध्दा मंगरूळनाथ तालूका विकास आघाडीच्या माध्यमातून जिव तोडून, साम दाम दंड भेद वापरून,जिवाच रान करून लक्ष्मी दर्शन करून आकाश पातळ एक करून अपयशी दिलेली लढत असेल ! खर म्हणजे डॉ.सिध्दार्थ देवळे याचा काहीही संबध नसतांना मंगरूळनाथ तालुक्याशी काही देण घेण नसतांना फक्त आणी फक्त आपली आमदारकी गेली,याचा राग मनात धरून, प्रत्येक निवडणुकीत सुभाषराव ठाकरे याचे विरोधकांना पाठबळ देणे, त्यांना रसद पुरविणे, जिथे संधी मिळेल तिथे मिळेल तिथे सुभाषराव ठाकरे याना विरोध करणे हा एकमेव कार्यक्रम हाती घेतला. याचा परिणाम डॉ. देवळे यांनी मंगरूळनाथ तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकीत भाग घेतल्याने मागील पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची झालेली निवडणूक यावेळी सुभाषराव ठाकरे याच्या पॅनेलचे उमेदवार प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाले. 
हिच काय डॉ.  देवळे   याची फलश्रुती? बर आता डॉ. देवळे यांनी सुभाषराव ठाकरे याना दिलेला ञास  सुभाषराव ठाकरे विसरतील ते सुभाषराव ठाकरे कसले ? कारण शरद पवार याचे तालमीत तयार झालेले शिष्य हिशोब चुकता नक्की करणार!
बर हेही बाजुला ठेवुन आपण मुळ विषयाकडे येऊ! डॉ.  देवळे याचा सुभाषराव ठाकरे याना असलेला विरोध हे वाशिम मंगरूळनाथ मतदार संघातील सुभाषराव ठाकरे विरोधकांनी हेरला.              शञुचा शञु! तो आपला मित्र
   विरोधकांनी वापरले हे सुञ !
आणी इथून सुरू झाला खरा  खेळ 
लोकसभेत साधली अचूक  वेळ
                         वाशिम मंगरूळनाथ मतदार संघातील विरोधकांनी लोकसभेचे उमेदवार  देशमुख व डॉ. देवळे याची भेट घडवून आणली. देवळे ची सगळी पाश्र्वभूमी सांगीतली. देवळे च लक्ष आणी महत्त्वकांक्षा सांगीतली. शिवाय उपद्रव मुल्याच महत्व ही पटवून दिल. विधान सभेला घेतलेली 52000/ मते दाखवून दिली. सगळ्याच गोष्टीचा उहापोह झाला. मग काय देशमुखांना तर तेच हव होत. मग  ठरल !!
लोकसभेला तुम्ही मला मदत करा. 
विधान सभेला मी तुम्हाला करतो. 
दरम्यानचे काळात अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, नियोजन कुनियोजन झाल. त्या नियोजनानुसार 
लोकसभेला डॉ.  देवळे यांनी आपल्या वंचित आघाडीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष या नात्याने वंचितच्या उमेदवाराचा  ए बी फार्म  चुकवायचा ‼ जेणेकरून लोकसभेला वंचितचा उमेदवार राहणार नाही. 
आणी वंचित उमेदवार लोकसभेला नसणे कुणाला फायदेशीर ठरणार हे लोकसभेत दिसून आल. 
बर मी वंचित उमेदवाराचा  ए बी फार्म  चुकवतो पण मग मला काय? तर त्या बदल्यात लोकसभेचे उमेदवार देशमुख व वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघातील सुभाषराव ठाकरे याचे कट्टर विरोधक, व  काही मी फक्त काही म्हणतोय बर ! काही उबाठाचे पदाधिकारी यांनी डॉ.  देवळे  याना महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्हीच! तुम्ही फक्त लोकसभेत वंचित उमेदवार कसा नसेल! कसा बाद होईल! एवढ करा. 
शक्यतोवर उमेदवार देऊ नका!
  दिलाच तर ए बी फार्म चुकवा ! 
 असा सौदा झाला! डिल झाली ! 
हि  सौदेबाजी ....... 
अगोदर  वाशीम  ला!
नंतर  दिग्रस  ला!
आणी नंतर  मुंबई  ला  ठरली!
ठरल्या प्रमाणे डॉ.  देवळे  नी इमाने इतबारे आपली कामगिरी,जबाबदारी  चोख  पार पाडली. 
 वंचित उमेदवाराचा ए बी फार्म चुकला, आणी वंचित उमेदवार निवडणुकीतून बाद झाला. इकडे यवतमाळ वाशिम मतदार संघात महाविकास आघाडीत  जल्लोष  झाला.  त्यानंतर लोकसभेत  वंचित उमेदवार  नसणे, याचा निवडणुकीवर परिणाम काय होऊ होणार! काय निकाल लागणार! कोणाला फटका बसणार! 
आणी कोणाला फायदा होणार! 
कोणाची मते कमी होणार!
कोणाची वाढणार!
कोण विजयी होणार! 
हे आपण लोकसभेत पाहलच!
त्यामुळे वेगळ सांगायची गरज नाही. 
लोकसभेच्या अगोदर ठरल्या प्रमाण लोकसभेत झाल! त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. 
डॉ.  देवळे  नी कामगिरी  फत्ते  केली! 
आता वेळ आहे! त्या वाशिम मंगरूळनाथ मतदार संघातील त्या उबाठा चे काही  मोजके मी परत परत तेच उल्लेख करतो, काही  मोजके पदाधिकारी व खासदार देशमुख याची! दिलेला  शब्द पाळण्याची! 
डॉ. देवळे ना उबाठा ची उमेदवारी देण्याची ‼ 
                   त्यासाठी वरील सर्व मंडळींकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण दिलेला शब्द तर पाळावा लागणार! पण या  सौदेबाजार, देवाणघेवाण, उपरा याला खालील सामान्य शिव सैनिकाचा प्रचंड विरोध होत आहे.
त्याच्यात  असंतोष खदखदत सुरू आहे. परिस्थिती  गंभिर  आहे. 
असंतोषाचा कधीही  स्पोट  होऊ शकतो. 
शिव सैनिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. 
म्हणून सगळ  आस्ते कदम सुरू आहे.
जेणेकरून शिव सैनिकात नाराजी निर्माण होईल. 
त्याना विचार करायला वेळ मिळेल. 
मग ते वेगळा निर्णय घेतील. 
याचा फटका महाविकास आघाडीला बसेस. 
शिव सैनिकाना कुठलाही निर्णय घेण्यासाठी वेळच मिळू नये. याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
प्रत्येक पाऊल जपून टाकल्या जात आहे.
ब-याच घटना जेवढ्या शांतपणे,तेवढ्याच  वेगवान
 घडत आहे.
                           काही दिवसांपुर्वी खासदार देशमुख , वाशिम मंगरूळनाथ विधान सभा मतदार संघातील मोजकेच पदाधिकारी,  डॉ.  देवळे  च त्याचे विश्वासु सहकारी याची  मुम्बई  वारी झाली. त्यात पक्षाचे प्रमुखाकाडून  उमेदवारीचा शब्द  घेऊन बाहेर पडल्यावर डॉ. *देवळे* यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडी च्या पश्चिम विदर्भ अध्यक्ष  पदाचा राजीनामा दिला.  
त्याच वेळेस आघाडीचा *उमेदवार* ठरला. डॉ.  देवळे  हे शंभर टक्के आघाडीचे उमेदवार आहेत. यात एक  टक्का  ही बदल नाही. 
फक्त  घोषणा तेवढी बाकी आहे. आणी घोषणा न होणयामागच खर   बंडखोरी  हे सर्वात मोठ कारण आहे.
फक्त निवडणूक जाहीर होण्याची!
आचारसंहिता लागण्याची वाट आहे!
लगेच डॉ.  देवळे  चा पक्ष प्रवेश करून उमेदवारीची घोषणा करण्यात येईल. 
 निष्ठावंताना  पुन्हा एकदा *ठेगा* 
दाखवल्या जाईल. 
कारण डॉ.  देवळे  ची उमेदवारी ही लोकसभा निवडणुकी पुर्वी च ठरली होती. 
आता फक्त काय ते  घोषणा  बाकी आहे.
आणी घोषणेची वाट पाहणे फक्त  निष्ठावंत  शिव सैनिकांच्या हाती आहे.
शिव सैनिकानो एक लक्षात ठेवा!
 निष्ठेची फक्त विष्ठा  होत असते!
निष्ठेचा आचार (लोणच) कधीच होत नाही ‼ 
आणी  विष्ठेचा फक्त घाणेरडा वास येतो  ‼ 
आचाराच तस नाही, आचार जेवढ जुन तेवढ पौष्टिक  तेवढे त्यात  औषधी गुणधर्म  ‼ 
आता ठरवा तुम्हाला काय करायचंय ‼ 
काय नाही करायचंय ‼ 
आदरणीय बाळासाहेबांचा स्वाभिमानी शिव सैनिक व्हायचंय ‼ 
महाविकास आघाडीचा लाचार कार्यकर्ता ‼ 

Post a Comment

0 Comments