Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते स्व.तुकाराम पाटील येडशीकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले

 

शेलुबाजार वार्ता :⁠- श्याम अपूर्वा.

 परिसरात प्रत्येकाने शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हावे या बाबीवर काम करण्याचे धाडस प्रत्येकाने निर्माण करावे या माध्यमातून अनेक उपक्रमात रेल जेलमध्ये अनेक उपक्रम साध्य होतात तसेच
यावेळी उद्घाटक म्हणून गावातील जेष्ठ नागरिक मा.नारायणराव बारड आनंदराव पाटील कमल ताई आरू महादेव चक्रनारायण.बबनराव चक्रनारायण.पांडुरंग वंजारी.जितेंद्र पाटील. विवेक बारड.शहादेव चक्रनारायण.महादेव बारड गुरुजी. व गावातील वाचनालयाचे सर्व वाचक सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळा पूजनानंतर अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. गावामध्ये गरीब होतकरू विद्यार्थ्यांची मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिकांनी वाचनालय व्यवस्थापकांचे मनःपूर्वक आभार मानले या अभ्यासिकेमध्ये सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध केली आहे पूर्ण अभ्यासिका मोफत ठेवलेली आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ही अभ्यासिका सुरू राहील आज लोकनेते स्व. तुकाराम जी पाटील यांची पुण्यतिथी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण भावी पिढीला व्हावी त्यांनी त्याकाळी गावामध्ये प्रशस्त ग्रामपंचायत भवन लोकवर्गणी आणि श्रमदानातून उभे केले येडशी ते येडशी फाटा व येडशी ते (कुंड)हा रस्ता श्रमदान आणि लोक वर्गणीतून तयार केला आजही गावकऱ्यांना त्यांच्या कार्याची आठवण येते ते येडशी ग्रामपंचायतचे प्रथम सरपंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने त्यांनी शेलुबाजार येथे लक्ष्मीचंद विद्यालयाची स्थापना केली ते त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी शेलुबाजार येथे शेतकऱ्यांना परिसरातील शेतकऱ्यांना मोफत दराने कर्ज पुरवठा उपलब्ध व्हाव या उद्देशाने विविध कार्यकारी सहकारी संस्थेची स्थापना केली ते या संस्थेचे सुद्धा संस्थापकी अध्यक्ष होते मंगरूळपीर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अकोला जिल्हा‌ सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष असे सहकाराचे विविध पदे भूषवून त्यांनी त्याकाळी लोक उपयोगी अनेक कामे केली.शेलुबाजार व मंगरूळपीर येथील बँकेच्या इमारती त्यांनी श्रमदान आणि लोक वर्गणीतून भव्य प्रमाणात केल्या म्हणून त्याकाळी त्यांना लोकनेते ही पदवी मिळाली.
गावामध्ये त्यांच्या नावाने दोन संस्था गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केले व दूध उत्पादक सहकारी संस्था आणि स्वर्गीय तुकाराम पाटील सार्वजनिक वाचनालय सार्वजनिक वाचनालय हे ब वर्गाचे वाचनालय असून गावामध्ये अनेक उपक्रम राबविले असते गावातील अनेक लोक या वाचनालयाचा अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून भव्य स्वरूपात लाभ घेण्यात येतो अशा या लोकनेत्यांची पुण्यतिथी गावामध्ये मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी केली जाते जिल्हा बँकेने त्यांचे मंगरूळ बँकेचे आवारात स्मारक उभे केले आहे तसेच गावकऱ्यांनी सुद्धा गावांमध्ये स्मारक उभे केले आहे
या अनेक अभ्यासिकेतून गावातील मोठ्या प्रमाणात सर्वच विद्यार्थी घडावे व संपूर्ण परिसरातून या गावाचे उज्वल भविष्य होण्यासाठी मदत होईल खरी या लोकनेत्या श्रद्धांजली असे उद्गार यावेळी मा नारायणराव बारड साहेबांनी मत व्यक्त केले व कार्यक्रमात यशस्वी होण्याकरिता पोलीस पाटील गणेश बारड अविनाश बारड विवेक बारड वाचनालयाचे सचिव राजेंद्र बारड यांनी विशेष परिश्रम घेऊन हा उत्सवात कार्यक्रम संपन्न केले असे जाहीर केले

Post a Comment

0 Comments