धानोरा खुर्द :वार्ताहर -येथून श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा (खुर्द) येथे विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करता यावं यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये किक बॉक्सिंग बॉक्सिंग तायकांडो कराटे इत्यादीचे प्रशिक्षण दिनांक 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये मुलींना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्याचा मानस
शाळा प्रशासनाचा आहे यातून मुली आपल्या स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम होतील व सध्या परिस्थितीत मुलींवर होत असलेले अत्याचार त्यापासून स्वतःची सुटका करण्याकरता तिचे आत्मबल वाढेल या शुद्ध हेतूने हा अभिनव उपक्रम या शाळेने सुरू केलेला आहे याकरिता प्रशिक्षक म्हणून भाग्यश्री चिमणकर व सौ अंजली धानोरकर, मॅडम, रंजना चौधरी मॅडम , तेजल तायडे मॅडम, योगिता होले मॅडम इत्यादी विशेष परिश्रम घेत आहेत. या अभिनव उपक्रमाची माहिती कळताच मंगरूळपिर तालुक्याच्या बीईओ गोंदेवार मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थी व शिक्षकांचे मनोबल वाढविले. मुख्याध्यापक मंगेश धानोरकर यांच्या या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments