मंगरूळपीर स्थानिक हुडको कॉलनी स्थित अभ्यासा इंग्लिश स्कूल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सर्वप्रथम विद्येची दैवता माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष आत्माराम चव्हाण ,प्रमुख पाहुणे डॉ अजय वाघमारे नेत्ररोग तज्ञ शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा चव्हाण, संपादक सुधाकर चौधरी यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित सर्व पालकांचे शाळेच्या सर्व शिक्षिका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रस्ताविक भाषण शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची शालेय प्रगती ,शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांची स्वच्छता टिफिन बद्दल माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले .प्रमुख पाहुणे डॉअजय वाघमारे नेत्ररोग तज्ञ यांनी सर्व पालकांना आरोग्या बद्दल मार्गदर्शन केले व पालकांशी चर्चा करून नेत्ररोगाबद्दल मार्गदर्शन केले. संपादक सुधाकर चौधरी यांनी सर्व पालकांना आपल्या पाल्याबद्दल जागृत राहावे व मुलांच्या तांत्रिक अडचणी घरी सोडवाव्यात सांगितले .संस्थाध्यक्ष आत्माराम चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना शाळेमध्ये होणारे इव्हेंट्स, पालकांचे सहकार्य ,गॅदरिंग व सहली संबंधी माहिती देऊन प्रथम सत्र परीक्षेमध्ये सर्व उत्तीर्ण वियाद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता शाळेच्या शिक्षिका काजल कंटाळे, साक्षी गावंडे, शिल्पा देवळे, आरती मनवर ,भाग्यश्री कानेड , स्मितल देवळे, राजनंदनी चौधरी पल्लवी गोरटे ,सोनाली राठोड, वैष्णवी चौधरी, व कर्मचारी वर्षा सोनोने ,संतोष भडांगे यांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात पालक सभा संपन्न झाली
0 Comments