Ticker

6/recent/ticker-posts

पंजाबराव कृषी विद्यापीठ मधील कामगार मजुरांना न्याय द्या! समाजसेवक गजानन हरणे यांचे प्रशासनास मागणी!

पंजाबराव कृषी विद्यापीठ  येथील कामगार मजूर यांना शासकीय प्रशासकीय यंत्रणा कित्येक वर्षापासून त्यांच्या हक्कापासून झुलवत ठेवीत आहेत. अनेक वेळा आंदोलने करूनही आश्वासनाशिवाय या मजुरांच्या हातात दुसरे काही पडले नाही. शासकीय यंत्रणा एवढी मुजोर झाली आहे की शासनाने केलेले कायदे पाळण्यास साठी आंदोलने उपोषणे करावे लागतात ही सर्वात मोठी दुःखाची बाब आहे गरजू महिला पुरुष पी के व्ही मध्ये काम करीत असतात परंतु त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवल्या जाते हे दुःख सहन न झालेले संवेद्यनशील व्यक्तिमत्व रवी राठी यांनी त्यांच्या या दुःखाला वाचा फोडण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या गेट समोर आमरण उपोषण स्वतःसह मजूर महिला करीत आहे तरीही शासकीय प्रशासकीय यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन मुंग गिळून बसली या निगरमट्टा शासनाचा प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो. व या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो!! 
गजानन हरणे, समाजसेवक तथा संयोजक
 निर्भय बनो जन आंदोलन महाराष्ट्र राज्य.

Post a Comment

0 Comments