वाशिम - मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा बीट मधील ग्राम पोघात येथे जी.आय.झेड व डब्लू. एच. एच. यांच्या सहकार्याने स्वयंम शिक्षण प्रयोग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प मंगरुळपिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण माह निमित्ताने पोषण उत्सव साजरा करण्यात आला. या पोषण माहच्या माध्यमातून पोषणविषयक कार्यक्रम आयोजीत करण्याचा हेतू म्हणजे जनतेमध्ये पोषणविषयी जागरूकता वाढवणे, रोजच्या आहारात विविधतापुर्ण पोषक अन्न घटकांचा समावेश करून कुपोषण मुक्त निरोगी आयुष्य जगावे हा मुख्य उद्देश साध्य करणे हा आहे.
यात विशेषतः ०६ ते २३ महिने वयोगटातील बालके व १५ ते ४९ वर्षे वयोगटतील संतुलित आहार, पोषणाचे महत्त्व, आणि विविध आहार घटकांच्या योग्य सेवनाबद्दल माहिती करून दिली, त्याचबरोबर विविध पोषण जनजागृती पर उपक्रम व कार्यक्रम नियोजन केले. त्यात विविधतापूर्ण पौष्टिक कडधान्ये, भरडधान्य, रानभाज्याच्या पाककृती, पोषणम प्रकल्पाचे आय.इ.सी बँनर्स, पोषण रांगोळीचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्याचबरोबर दैनंदिन रोजच्या सकस पौष्टिक आहाराचा समावेश व पोषण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, बालक संगोपन व पालक भूमिका, लिंगभाव- पुरुषाचा सहभाग, परसबाग, गावामध्ये दहा आहार समूह म्हणजे काय व कोणते, लोकांच्या रोजच्या आहारात किमान ५-६ आहार समूहाचा वापर करणे किती गरजेचे आहे याबद्दल पर्यवेक्षिका अर्चना फाळे व दीपाली कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्याबरोबर कार्यक्रमात ओटीभरण व सहा महीने पूर्ण झालेल्या बालकांचे अर्धवर्षिक अन्नप्राशन विधी व त्याच्या मातांचा वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. स्वयंम शिक्षण प्रयोगच्या क्षेत्र अधिकारी आम्रपाली मनवर पोषणम प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय पोषण माह साजरा कसा करण्यात येणार याबाबत तसेच कुपोषण व त्याचे प्रकार आणि कुपोषण चक्र कसे तोडावे, स्तनपान, वैयक्तिक स्वछता, परसबाग लागवड, सामाजिक व्यवहार, सकारात्मक दृष्टिकोन याबाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य आरिफाबी शेख फकीर मोहम्मद, गावच्या सरपंच पल्लवी रतन वाघमारे, मंगरुळपीर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राऊत, पर्यवेक्षिका अर्चना फाळे, दीपाली कांबळे, मैथिली धनवट, पोषण मित्र गंगा ठाकरे, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा, सीआरपी तसेच गावातील किशोरवयीन मुली, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिला - पुरुष, ग्राम पंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments