Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहिम

वाशिम - श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था झाकलवाडी जि. वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ सप्टेंबर रोजी स्थानिक बसस्थानक परिसरात स्वच्छता पंधरवडा जनजागृती कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे असा संदेश विद्यार्थ्यांनी त्यांच्या श्रमदानातून समाजाला दिला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी बसस्थानकांचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पदाधिकारी प्रा. डॉ. मनीषा कीर्तने, प्रा.डॉ. रवींद्र पवार यांच्यासह अनंत ढोले, श्रावणी राजणकर यांच्यासह आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Post a Comment

0 Comments