Ticker

6/recent/ticker-posts

अबब....! आदर्श ग्राम मंगळसा फाटा ये प्रगटला भला मोठा इंडियन अजगर


मंगरूळपीर तालुक्यातील मंगळस फाटा येथे  रात्री सात वाजताच्या  दरम्यान एक मोठा साप नागरिकांना दिसून आला.
मंगरूळपीर येथील सर्पमित्रांना कॉल आल्याबरोबर कोणत्याही प्रकारचा विलंब न करता घटनास्थळी पोहोचले. 
सर्पमित्र लखन खोडे, दीपक सोळंके , मुन्ना मुंदे , सिद्धार्थ इंगोले, शरद दंडे, इत्यादी सहकारी मित्र मोठ्या सीताफिने हे सर्व कामाला लागले

 पाहते तर काय भला मोठा अजगर त्या अजगराला ताब्यात घेण्याकरता सर्पमित्रांना बरेच कष्ट घ्यावे लागले आपल्या जीवाची पर्वा न करता कारण हा दुर्मिळ इंडियन अजगर  असल्यामुळे काम थोडे जोखमीचे होते त्या अजगराला ताब्यात घेतल्याबरोबर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कळवले तो अजगर त्यांच्या ताब्यात देण्यात आला
वन विभागाचे कर्मचारी रुपेश जामकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्या अजगरास वनोजा येथील अभयारण्यात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले

Post a Comment

0 Comments