Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हयातील श्री गणेश विसर्जन शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडले



वाशिम जिल्हयामध्ये दि.०७.०९.२०२४ रोजी एकुण ७८४ श्रीगणेश मंडळांचे स्थापणा झाल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सा., अपर पोलीस अधीक्षक, यांचे मागदर्शनात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिनांक १९/०९/२०२४ पर्यंत सर्व श्रीगणेश विसर्जन शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडले असुन यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

श्रीगणेश उत्सव संबंधाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे . यांनी जिल्हा पोलीस दलातर्फे डि.जे. व लेझर लाईटशो मुक्त श्रीगणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हयातील सर्व गणेश मंडळ व नागरीकांना केले होते. त्याला ब-याच प्रमाणत प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकी काही अपवादात्मक डि.जे. धारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचेवर पोलीस स्टेशन विभागाकडुन कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन वाशिम शहर यांनी १४ डि.जे धारकांवर कारवाई करुन ५,००,००० /- रु. पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण ०२ डि.जे. ५२,०००/-रु, अनसिंग ०४ डि.जे. ५४,०००/-रु तसेच पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांनी ०२ डि.जे. ४०,०००/- रु असे एकुण २२ डि.जे. धारकांवर कारवाई करुन ६ लाख ४६ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हयाचे इतिहासात आज पावेतो मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

आगामी काळात येणारे सण उत्सव, लग्न समारंभ, इतर समारंभामध्ये डि.जे चा वापर करुन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर कायदेशीद व सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस स्टेशन शिरपुर येथील श्रीगणेश विर्सजन मिरवणुकी ही मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे संकल्पनेतुन डि.जे मुक्त काढण्यात आलेली पोलीस स्टेशन शिरपुर येथील श्री गणेश मंडळाचे व नागरीकांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले.

वाशिम जिल्हयामध्ये श्रीगणेश मंडळांचे सर्व व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देवुन लेझर लाईटशो वापरलेला नाही त्या सर्व मंडळ व्यवस्थापक व नागरीकांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे सा. यांनी कौतुक करुन आभार व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments