शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?
1) एकनाथ शिंदे
2) दादा भुसे
3) शंभूराज देसाई
4) गुलाबराव पाटील
5) अर्जुन खोतकर
6) संजय राठोड
7) उदय सामंत
दरम्यान, भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.
कोणकोणत्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण?
योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंह सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय
भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा
पुष्कर सिंह धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड
देशातील संत महंतांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
नरेंद्र महाराज नानीद
नामदेव शास्त्री, भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
गौरांगदास महाराज, इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज
जैन मुनी लोकेश
मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला. VVIP आणि VIP यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करण्यात आली.
0 Comments