"स्वातंत्र्याच्या साक्षीने न्यायालयीन एकता"
मंगरुळपीर, ता. १५ :
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आज मंगरुळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा सन्मानपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन न्यायालयीन मानमर्यादा व सर्व नियम-अटींचे पालन करून करण्यात आले.
जिल्हा व सत्र न्यायालयात माननीय श्री. व्ही. व्ही. पाटील (जिल्हा न्यायाधीश-१) यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकविण्यात आला, तर दिवाणी न्यायालयात माननीय श्री. डी. बी. हंबीरे (दिवाणी न्यायाधीश व ज्येष्ठ स्तर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज सलामीदरम्यान उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीताच्या स्वरात राष्ट्राला अभिवादन केले.
या प्रसंगी श्री के. सी. कलाल (सहायक दिवाणी न्यायाधीश स्तर), श्री. एस. डी. तारे (द्वितीय सहायक दिवाणी न्यायाधीश), तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर. एस. पांडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट बोलके, सचिव ॲडव्होकेट ए. के. मुळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बी. एम. ठाकरे, ॲडव्होकेट जी. बी. राठी, ॲडव्होकेट एन. एम. मुळे, ॲडव्होकेट पी. पी. बन्सोड, ॲडव्होकेट डेंगाळे, ॲडव्होकेट आर. एन. देशमुख, ॲडव्होकेट पी. व्ही. पाटील, ॲडव्होकेट आर. एस. जास्त्रोटीया, ॲडव्होकेट पी. आर. बंग, ॲडव्होकेट आर. जे. ठाकरे, ॲडव्होकेट आर. डी. टोपले, ॲडव्होकेट एस. एन. जोशी, ॲडव्होकेट अहकीम, ॲडव्होकेट एस. एन. सरकाळे, ॲडव्होकेट गिरडेकर, ॲडव्होकेट ए. बी. पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
न्यायालयीन अधीक्षक श्री. आर. डी. चव्हाण, सहायक अधीक्षक श्री. अकम खान, श्री. एस. बी. काळकर, श्री. भोजापुरे, श्री. अकबर, सौ. सोनटक्के मॅडम तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्य संग्रामातील अमर शहीदांना अभिवादन करण्यात आले, तसेच देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले.
0 Comments