'कर्करोग मे योग" व्याप्ति, प्रमाण एवं विकास या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद" आयुष मंत्रालय - नवी
दिल्ली, इंडियन योगा असोशिएशन - नवी दिल्ली, टाटा मेमोरियलसेंटर - मुंबई यांच्या सहयोगाने 4 ते 7 डिसेंबर
2024 रोजी आयोजन
-
लोणावळा येथे 1924 साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती. योग
क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची कैवल्यधाम ही एक प्राचीन योग संस्था आहे. 7 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेने
आपली शतकपूर्ती केली आहे तसेच संस्थेच्या 2023-24 या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या
राबविले आहेत. आपल्या शतकपूर्तीचे औचित्य साधून संस्थेने आयुष मंत्रालय नवी दिल्ली, इंडियन योगा
असोशिएशन - नवी दिल्ली, टाटा मेमोरियल सेंटर - मुंबई यांच्या सहयोगाने 4 ते 7 डिसेंबर 2024 रोजी 11th
इंटरनॅशनल कॉन्फरेन्स ऑन योगा इन कॅन्सर केअर , स्कोप , इव्हिडन्स अँड इवोलुशन
(विथ आयुष ) – “ कर्करोग मे योग" व्याप्ति, प्रमाण एवं विकास " या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे
आयोजन केले आहे . या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देश विदेशातील प्रतिनिधी ओन्सिट आणि ऑनलाईन मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते. तसेच कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सुद्धा
सहभाग घेतला होता.
4 डिसेंबर 2024 रोजी परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींची नोंदणी (रेजिस्ट्रेशन )
करण्यात आली तसेच परीषदे पूर्वी वर्कशॉप कॉलीटीॅटिव्ह रिसर्च मेथोडन्स योगा आणि
वर्कशॉप - रिसर्च मेथोडंसं फॉर डेसिगनिंग योगा स्टडीस इन कॅन्सर या विषयांवरील दोन
कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी महर्षी पतंजली यांची मंगलमय वातावरणात पुजा करण्यात आली. यानंतर 11 व्या
आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उद्घाटनाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली सन्मानीय प्रमुख पाहुणे डॉ. पंकज
चतुर्वेदी (डायरेक्टर ऑफ ध अडवान्सड सेन्टर फॉर ट्रीटमेंट , रिसर्च अँड एज्युकेशन इन
कॅन्सर , टाटा मेमोरियल सेन्टर ) यांच्या शुभ हस्ते कैवल्यधाम योग संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओम
प्रकाश तिवारी, कैवल्यधाम संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी, डॉ. सतबीर खालसा, डॉ.
पो.जु.लिन आणि डॉ के. एस. गोपीनाथ यांच्या प्रमुख उपस्थितील दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
श्री सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि व्यासपीठावरील उपस्थित पाहुण्यांचा संक्षिप्त स्वरूपात
परिचय करून दिला. संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी यांनी प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांना
कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा आणि शाल देऊन सन्मानित केले. तसेच संस्थचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी
अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी व्यासपीठावरील मान्यवर डॉ. सतबीर खालसा, डॉ.पा.जु.लिन, डॉ. के.एस.
गोपीनाथ यांचा शाल आणि योगविषयक पुस्तके देऊन सन्मान केला. यानंतर कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट
दाखविण्यात आला. डॉ. सतबीर खालसा यांनी उपस्थितांना संबोधित केले. या नंतर "कर्करोग में योग" या
विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेतील प्रथम टप्प्यावरील कर्करोगावर
योगाद्वारे मात केलेल्या बहुकुशल कामगार श्रीमती सुनीता फतरोड हिच्या जीवनावरील माहितीपट दाखवून प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते तिचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. पा. जुलिन आणि डॉ. के. एस. गोपीनाथ यांनी
उपस्थितांना आपल्या भाषणशैलीतून संबोधित केले. यानंतर कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षामध्ये राबविलेल्या
विविध उपक्रमांची, व संस्थेस भेटी दिलेल्या मान्यवरांची चित्रफितीद्वारे माहिती संक्षिप्त स्वरूपात दाखविण्यात
आली .
प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन शनाया वात्सायन यांनी केले.
“ओम पूर्ण मद” शांती पाठाने उद्घाटन समारंभाची सांगता करण्यात आली.
0 Comments