Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर भिवंडीत


महाराजांचे हे मंदिर 

महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. तटबंदीच्या खालील ३६ चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत. या चित्राची माहिती येथे भेट देणाऱ्या सर्वभाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चित्रा खाली लिहण्यात येणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांच्या हातून अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती साकारण्यात आली आहे. सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती साकारण्यात आली आहे. या अखंड दगडातून साकारलेल्या या मूर्तीमधून चैतन्य कसे येईल याची काळजी मूर्ती घडविताना घेतली आहे, अशी माहिती राजूभाऊ चौधरी यांनी दिली.

तटबंदी दीड एकर क्षेत्रात

या परिसरात केवळ मंदिर नव्हे तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा व शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे. गाभारा सभामंडप हा परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे. या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण, वैदिक शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचा असून, हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ह भ प कैलास महाराज नीचीते यांनी व्यक्त केला आहे.

लोकार्पण सोहळा निमित्त 12 ते 17 मार्च दरम्यान वैदिक आणि पौराणिक ब्राम्हण यांच्याकडून शास्त्रोक्त पूजा करून हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी गोपूजन, होम हवन, 108 हवनकुंड, वास्तूपुजन आणि त्यानंतर कलश पूजन, लोकार्पण सोहळा संपन्न होईल. तर सायंकाळच्या वेळी स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम शिवचरित्र व्याख्यान, इतिहासकार, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत, अशी माहिती किल्ले रायगड येथील शिवराज्यभिषेक राजपुरोहित प्रकाशस्वामी जंगम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments