Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष


वाशीम तालुका प्रतिनिधी –
सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन देशभक्तीच्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि दणदणीत जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मार्गदर्शक डी. एन. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा चे संचालक बबनरावजी पाटील, शाळेचे प्राचार्य सी. एम. ठाकरे, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, वाय. सी. इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डी. डी. राजपूत, उपप्राचार्य सौ. शेवाळे, मॉड एस. बी. कराडेएम. पी. राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.


त्यांच्या शुभहस्ते ध्वज व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन पार पडले. यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतपसायदान यांचा गजर परिसरात दुमदुमला. सर्व मान्यवरांचे स्वागत शिक्षक वृंदांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सी. एम. ठाकरे यांनी केले. शाळेतील विद्यार्थी राजवीर गोळे, श्रीहरी मिसाळ, महेश बोराडे, वेदांत नवघरे यांनी मनोगते व्यक्त करून स्वातंत्र्याचा अभिमान जागविला.

अध्यक्षीय भाषणात डी. एन. पाटील म्हणाले, “भारताला हे स्वातंत्र्य सहजासहजी लाभलेले नाही. हजारो सैनिकांनी प्राणाची आहुती देऊन आपणास हा अमूल्य वारसा दिला आहे. आपणही देशासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. तिरंगा उंच फडकवणे हीच खरी शान आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमन गोपाळ ठाकरेसंतोष मोगरकर यांनी आकर्षक पद्धतीने केले. आभार प्रदर्शन किसन पारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वर्गशिक्षक के. व्ही. बोबडे व नववीतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी दिली.



Post a Comment

0 Comments