वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात मागील चार पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या महिन्यात गर्मी होत होती आज त्याचे रूपांतर थेट पावसात झाले
आज सकाळी आभाळ मोकळे होऊन ऊन तापत असताना अचानक दुपार पासून आभाळ दाटून ढगाळ वातावरण निर्माण झाले व सायंकाळी थेट अवकाळी पावसाच्या सरी जवळपास १५ ते २० मिनिटाहून अधिक वेळापर्यंत थेट तालुक्यातील काही भागात कोसळल्या यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहेत.
कापसाची नासाडी
तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून असून शेत पांढरे दिसत असताना मजुराअभावी अजूनही अनेक शेतकऱ्यांनी दुसरा वेचाचा कापूस काढू शकले नाही त्यामुळे कापूस ओला झाल्यामुळे नुकसान नाकारता येत नाही.
तूर पिक करपण्याची भीती
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात तूर पिकाला शेंगा झाल्या असल्या तरी ओलीत असलेल्या शेतकऱ्यांची तूर पीक फुलावर आहेत. त्यामुळे अती पाऊसामुळे तूरिचा बहार करपण्याची भीती शेतकऱ्यांना सातवत आहेत.
चणा पीक उबावण्याची भीती
शेतात अनेकांचा चणा खूप लहान स्वरूपात असून आताच चणा पिकाला पावसाची गरज नव्हती. या पिकाला एका पाण्याची गरज असते. मात्र ते विकारी पाऊस असेल तर पूर्णतः चणा पीक उबावून करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.
मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम
थंडीचा ऋतू असताना गरमी होऊन अवकाळी पाऊस आल्याने मानवी आरोग्यावर सर्दी, खोकला,ताप हगवन, असे आजार होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधपचार करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहेत व पिण्याच्या पाण्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे.
0 Comments