मंगरूळपीर ता 16
मंगरूळपीर तालुक्यातील पंचशील नगर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद डेरे यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना धम्मदुत पुरस्काराने थायलंड भिक्खू संघाच्या वतीने 15 रोजी नागपूर येथे शाल,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
या धम्मदूत पुरस्कार सोहळ्यात देश विदेशातील भिक्खू संघ व मान्यवर उपस्थित होते
अखिल विश्वाला करुणा मैत्री शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश यात्रेचे वाशिम जिल्ह्यात आयोजन करून धम्माचा प्रसार व प्रचार सर्वदूर करण्यासाठी विनोद डेरे यांनी सर्वतोपरी योगदान दिले.यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले
जागतिक शांततेसाठी योगदान. हा पुरस्कार येथे अत्यंत आदराने प्रदान करण्यात येत आहे
सदर धम्मदुत पुरस्कार हा
इंटरनॅशनल इंटरचेंजला चालना देणाऱ्या उपक्रमांद्वारे जागतिक शांततेसाठी तुमच्या योगदानाची दखल घेऊन
तसेच कठीण परिस्थितीत लोकांना आशा आणि स्वप्ने दाखवणे आणि जीवनाचे मूल्य निर्माण करणे.
समाजाची सेवा करण्यासाठी तुमचे निस्वार्थी प्रयत्न सुरू ठेवत उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणारे विविध सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजक नितीन गजभिये सचीव
इंडो एशियन मेटा फाउंडेशन, भारत,अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय
शैक्षणिक संस्था आणि जागतिक आघाडी
बौद्धांचे (प्रादेशिक केंद्र नागपूर) हे होते.
0 Comments