पटना प्रतिनिधी –
पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि लोक आंदोलन व्यास, रालेगणसिद्धीच्या कार्याध्यक्षा आदरणीय कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली, बिहारच्या भविष्यासाठी ऐतिहासिक जनआंदोलन उभं राहणार आहे. येत्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून, पटण्याच्या गर्दनीबागेत मागण्या पूर्ण होईपर्यंत अखंड धरना आंदोलन छेडण्यात येणार असून, प्रशासनाच्या पायाखालची जमीन हलविण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या आंदोलनाच्या ठळक मागण्या –
1️⃣ संयुक्त विकास समितीची स्थापना – बिहारच्या विकास आराखड्यासाठी, थेट पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, सर्व पक्ष, तज्ज्ञ आणि जनतेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त विकास समिती तातडीने स्थापन करावी.
2️⃣ मतदार यादीतील अन्याय्य वगळण्यांची चौकशी – मुख्य निवडणूक आयुक्तांच्या प्रक्रियेत मतदार यादीतून काढलेल्या नागरिकांची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या आयोगात विरोधी पक्षांनाही प्रतिनिधित्व मिळावे.
3️⃣ न्याय आणि पारदर्शकता – आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करून, ज्यांची नावे अन्यायाने वगळली गेली आहेत त्यांना लगेच मतदार यादीत परत सामील करावे.
गर्दनीबाग हा बिहारमधील जनआंदोलनांचा ऐतिहासिक केंद्रबिंदू असून, यावेळी तो लोकशक्तीच्या प्रचंड लाटेने थरथरणार आहे. आंदोलनकर्त्यांचा इशारा स्पष्ट आहे – “मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, आणि या लढ्यात बिहारचा प्रत्येक नागरिक आमच्यासोबत असेल.”
अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने आणि कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली, हा लढा केवळ आंदोलन नाही तर बिहारच्या सन्मान, विकास आणि लोकशाही हक्कांसाठीची निर्णायक लढाई ठरणार आहे.
एकजूट बिहार - न्याय आणि विकासासाठी रणांगणात !"
0 Comments