Ticker

6/recent/ticker-posts

आठवणीतील हास्यसम्राट स्व. अरविंद भोंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमीत्त अंकुर साहित्य संघा तर्फे हास्य कवी संमेलन


अकोला
आठवणीतील हास्यसम्राट स्व. अरविंद भोंडे यांना भावपुर्ण श्रध्दांजली
यांच्या ४ स्मृतीदिनानिमीत्त
अंकुर साहित्य संघा तर्फे हास्य कवी संमेलन मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२५ जानोरकर मंगल कार्यालय, रिंग रोड, केशव नगर, अकोला येथे हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन धीरज अरविंद भोंडे, सौ.प्रिया धीरज भोंडे व अंकुर परीवार यांच्या वतीने करण्यात आले होते. श्रद्धांजली सभेला अध्यक्षा म्हणून सौ.विद्याताई सुनील खडसे यवतमाळ अंकुर जिल्हाध्यक्षा ,श्री मनोहर शहारे हे उपस्थित होते. 
 याप्रसंगी अंकुर साहित्य संघा तर्फे स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरासह सन्मानित करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी
 मिर्झा एक्सप्रेस झी टीव्ही.  हास्य सम्राट  डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, नेर, यवतमाळ, मा.श्री. नितीन वरणकार प्रसिद्ध हास्य कवी शेगाव, मा.प्रा.श्री. संजय कावरे वऱ्हाडी कवी मंगरूळनाथ , मा.श्री. गोपाल मापारी , प्रसिद्ध गझलकार बुलढाणा, मा. श्री. प्रशांत भोंडे प्रसिद्ध हास्य कवी अकोला इत्यादींनी एक से बढकर एक कविता सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली 
अंकुर साहित्य संघा तर्फे आठवणीतील हास्यसम्राट स्व. अरविंद भोंडे यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विशेष  सौजन्य हिम्मत ढाळे, तुळशीराम बोबडे, धीरज चावरे, विद्याताई बनाफर, डॉक्टर घुगे, राजाभाऊ देशमुख, गजानन छबिले, राजेश काटोले,दगडु वाहुरवाघ,  सुभाष तायडे, प्रल्हादराव गावंडे, प्रमोद राजंदेकर, मारोती नागोसे, श्याम हुजवंत, दिलीप वाहुरवाघ, अरूण सोने. इत्यादीं अंकुरच्या सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.
रशिक श्रोत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 
प्रास्ताविक अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष श्री हिम्मत ढाळे सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भोंडे यांनी केले व
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संजय कावरे यांनी केले..

Post a Comment

0 Comments