— विशेष प्रतिनिधी
वाशिम : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी गेली दहा वर्षे झुंजणारी 'विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना' आता एक यशस्वी टप्पा पार करत आहे. संघटनेने विविध प्रशासकीय आणि कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत हजारो प्रकल्पग्रस्त बांधवांना न्याय मिळवून दिला, आणि याच संघटनेचा वर्धापन दिन येत्या १८ मे २०२५ रोजी भव्य कार्यक्रमात साजरा होत आहे.
स्थळ - मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह पंचवटी चौक ते दयासागर रोड श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालया समोर अमरावती.वेळ सकाळी 11:00 वाजता .
या कार्यक्रमात ८३२ कोटी रुपयांच्या सानुग्रह अनुदान वितरणाचा प्रशासकीय आढावा, गावागावात होणाऱ्या चेक वाटपाचे नियोजन, तसेच प्रतिज्ञापत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या अधिकारांना धक्का देणाऱ्या 'मुद्दा क्र. ८' चा हटवलेला भाग, आणि नवीन करारनाम्याचा प्रारूप यावर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याशिवाय प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांसाठी १५% आरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देखील यावेळी मांडली जाईल.
या ऐतिहासिक दिवशी संघटनेच्या दशकभराच्या संघर्षाचा आढावा, यशोगाथा आणि भविष्यातील दिशा ठरवली जाणार आहे. सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे (निरीक्षक, महिला आघाडी, वाशिम जिल्हा - पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली) यांनी या कार्यक्रमात विदर्भातील सर्व प्रकल्पग्रस्त बांधवांनी, माता-भगिनींनी, युवा सुशिक्षित प्रमाणपत्रधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हानात्मक आवाहन केले आहे.
“हा लढा हक्काचा आहे, न्यायासाठीचा आहे आणि त्यात तुमच्या उपस्थितीचा आवाज अधिक बुलंद होईल” असे आवर्जून सांगत त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या एकतेचे महत्व अधोरेखित केले.
हा वर्धापन दिन म्हणजे संघर्ष, समर्पण आणि यशाचा संगम – आणि त्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपली उपस्थिती अत्यावश्यक आहे!
0 Comments