— सुधाकर चौधरी संपादक
पटना (बिहार) : सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांनी नुकतीच सेवानिवृत्त मेजर जनरल ए.एस. बजाज आणि त्यांच्या पत्नी यांची पटणा येथे सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान देशहित, महिला सशक्तीकरण, युवा प्रेरणा, आणि समाजातील सकारात्मक परिवर्तन या विषयांवर सखोल आणि विधायक चर्चा झाली. कल्पनाताईंनी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती मेजर जनरल बजाज यांना दिली.
त्याचबरोबर मेजर जनरल बजाज यांनी आपल्या सैनिकी कारकिर्दीतले अनुभव, शिस्तशीर जीवनशैली, आणि राष्ट्रसेवेचे महत्व विशद करत, तरुण पिढीने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे यावे, असा संदेश दिला. त्यांच्या पत्नींचा देखील महिला सक्षमीकरण विषयावर मोलाचा सहभाग होता.
ही सदिच्छा भेट म्हणजे दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधील विचारांची समृद्ध देवाणघेवाण ठरली असून, आगामी काळात राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास व संरक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्वांमध्ये सामंजस्याने कार्य करण्याचा मार्ग खुला झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
सामाजिक जागृती, लोकहित व राष्ट्रविकासाच्या दिशेने झपाटलेले नेतृत्व आणि अनुभवसंपन्न मार्गदर्शन यांची ही ऐतिहासिक भेट निश्चितच परिवर्तनाची नवी दिशा ठरू शकते, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
0 Comments