Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत महिला मंडळाचं प्रेरणादायी आयोजनजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ मालपाणी यांचा सत्कार



मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) — पंचायत समिती मंगरूळपीर येथील एकात्मिक महिला व बालविकास विभागाच्या वतीने कार्यरत असलेल्या प्रगती समुपदेशन केंद्रात, तसेच शिवरत्न बहुउद्देशीय महिला मंडळ, पोलीस स्टेशन आसेगाव आणि संत गोरोबा काका महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक संघर्षाचे व साहित्यिक योगदानाचे स्मरण करून आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ मालपाणी यांचा शिवरत्न महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वनमलाताई पेंढारकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्यातील सातत्य, महिलांप्रती असलेला सन्मान आणि निस्वार्थ सेवा वृत्तीचे यावेळी विशेष गौरव करण्यात आले.

वनमलाताई पेंढारकर म्हणाल्या की, "सुनीलभाऊ मालपाणी यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत राहावं हीच अपेक्षा आहे."

कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीने शोभा आली. यामध्ये ज्ञानेश्वर राठोड (कनिष्ठ सहाय्यक), श्रीमान सरकटे साहेब, निबंधक परेश राऊत, मंगेश सावंत (वरिष्ठ लिपिक), कौशल्या ताई बेलखेडे (प्रशिक्षणार्थी), सुनीलभाऊ मालपाणी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), संजय राऊत (ग्राहक पंचायत), अशोकराव भगत, अनिल भुसारे (युवा मोर्चा अध्यक्ष), गोपाल वर्मा (सामाजिक कार्यकर्ते), महादेव गहुले, दिगंबर काळे (उपसरपंच), हरिभाऊ भगत, तेजस राऊत (सहकारी संस्था), अतुल गायकवाड, सरपंच गिंबा व पिंटूभाऊ वक्ते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंटूभाऊ वक्ते यांनी तर आभार प्रदर्शन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वनमलाताई पेंढारकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊंचा लोकशाहीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकारी अधिकारी, महिला कार्यकर्त्या व समुपदेशन केंद्राचा मोलाचा सहभाग लाभला.

Post a Comment

0 Comments