कायद्याचं ज्ञान, आत्मसंरक्षणाची ढाल!"
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'सक्षम तू' अभियान – ठाणेदार किशोर शेळके यांना निवेदन सादर
मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) – विद्यार्थिनींमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण व्हावी, आत्मसंरक्षणाची भावना वाढीस लागावी यासाठी ‘सक्षम तू’ अभियानाचे आयोजन करण्यात येणार असून, या अभियानांतर्गत मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.
सौ. रुपाली चाकणकर (प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली,
सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे (जिल्हा महामंत्री – आरएमएसएस, समाजसेविका व संचालिका – जिनिंग प्रेसिंग, मंगरूळपीर) यांच्या पुढाकारातून हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी भरोसा सेल, बीट मार्शल व दामिनी पथक यांची उपस्थिती अनिवार्य करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारी, आत्मसंरक्षण, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक यांची माहिती मिळावी, यासाठी पोलिस विभागाने पुढाकार घ्यावा, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले.
निवेदन स्वीकृत करताना ठाणेदार किशोर शेळके यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “विद्यार्थ्यांपर्यंतश
कायद्याची माहिती पोहोचणे ही काळाची गरज आहे. पोलीस विभाग या मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे आश्वासन दिले.
या अभियानामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार असून, कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक त्रासाला तोंड देताना त्यांना योग्य मार्गदर्शन व मदतीचा आधार मिळणार आहे. महिलांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments