वाशीम (सुधाकर चौधरी)
– "सरकार झोपलंय, पण आमचं प्रश्न जागंय!" या गर्जनेतून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २४ जुलै रोजी सकाळी ८ ते १० दरम्यान पुसद नाका (वाशीम) येथे भव्य रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाचं नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष दिलीप भेंडेकर करत असून, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, व कष्टकरी कामगार यांच्यासाठी "कर्जमाफी, सातबारा कोरा, रोजगार व हक्काच्या योजनांची अंमलबजावणी" यांसारख्या मागण्यांसाठी चक्काजाम करण्यात येणार आहे.
आंदोलनाची ठळक रूपरेषा:
📍 स्थळ: पुसद नाका, वाशीम
🕗 वेळ: सकाळी ८ ते १०
👥 सहभाग: शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व सर्व कष्टकरी वर्ग
🎯 मुख्य मागण्या:
- संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी
- "सातबारा कोरा" आदेशांना धारदार अमल
- दिव्यांग, मजूर व मच्छीमारांसाठी कल्याणकारी योजना तत्काळ मंजूर
"शांत पण ठाम आंदोलन!"
प्रहारकडून प्रशासनास कळवण्यात आलं आहे की, रुग्णवाहिका, अग्निशामक व आपत्कालीन सेवांना कोणतीही अडचण होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा आदर राखत शांततेत आंदोलन पार पाडलं जाईल. स्वयंसेवक नियोजनबद्ध तैनात असतील.
"शेती केली, आता पेटून उठलो..."
"बोलून थकलो, आता रस्त्यावरच बोलतोय...!" असं सांगताना दिलीप भेंडेकर म्हणाले, "हे आंदोलन ही नुसती मागणी नाही, तर आमच्या जगण्याचा हुंकार आहे. बच्चुभाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही पेटून उठलोय. आता गप्प बसणार नाही."
२४ जुलैला सकाळी ८ ते १० वाजता, पुसद नाका वाशीम येथे... शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सर्वांनी सहभागी व्हा!
0 Comments