🚨 ब्रेकिंग न्यूज!
मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) –
शहराच्या मध्यवर्ती दर्गा चौकात आज एक जुनी मोडकळीस आलेली इमारत गडगडत कोसळली आणि काही क्षणांकरिता परिसरात अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, ही एक मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
पण खरी धक्कादायक बाब म्हणजे – घटनेला एक तास उलटूनही कुठलंच प्रशासनिक यंत्रणा, पोलीस, नगरपरिषद, अग्निशमन दल हजर झालेलं नाही!
जणू काही इथे कुणाचं राज्यच नाही!
नागरिकांनी टाहो फोडला, पण सरकारच्या कानावर मात्र अजूनपर्यंत जराही पडलेलं नाही!
"ह्या इमारतीबद्दल आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, पण नगरपरिषद झोपेतच होती!" – असं संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली.
कोसळलेली इमारत रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी पुढे आणखी एखादी भिंत ढासळली तर?
कोण घेणार जबाबदारी?
आज मंगरूळपीर शहर एक प्रश्न विचारतंय –
"प्रशासनाचं डोळं केव्हा उघडणार?"
"माणूस मेल्यावरच हे लोक जागे होणार का?"
सध्या तरी ढिगारा पडून तसाच पडून आहे... कुणी उठून हालचाल करत नाही...
ही केवळ इमारत कोसळली नाही – प्रशासनाची विश्वासार्हता, तत्परता आणि जवाबदारीसुद्धा ढासळली!
पुढील तपशील लवकरच...
आपणच शोधू, आपणच लढू – वाशिम खबर आवाज महाराष्ट्र!
0 Comments