Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मंगरूळपीर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रांतस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सभा


मंगरूळपीर (सुधाकर चौधरी):
दास मारोती संस्थान, मंगरूळपीर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मंगरूळपीर तालुक्याच्या कार्यकर्त्यांची भव्य सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेला विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे, प्रांत सचिव श्री. चारूदत्त चौधरी, प्रांत संघटन मंत्री श्री. अभय खेडकर आणि महिला आघाडीच्या डॉ. शोभाताई गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ग्राहक हक्क, सामाजिक जबाबदारी आणि संघटन बळकटीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे ग्राहक पंचायतच्या स्थापनेपासून प्रथमच मंगरूळपीर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही घोषणा खुद्द प्रांताध्यक्ष डॉ. मेहरे यांच्या हस्ते करण्यात आली. या घोषणेला प्रांत सचिव व संघटन मंत्री यांची उपस्थिती लाभल्यामुळे हा दुग्धशर्करा योग ठरला.

घोषित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

  • तालुका अध्यक्ष: संजय राठी (महसूल व नगर परिषद आयाम प्रमुख)
  • सचिव: गजानन व्यवहारे
  • उपाध्यक्ष: विजय लोहिया (प्रवासी संघ आयाम प्रमुख)
  • सहसचिव: अरविंद भगत (बँक व विमा आयाम प्रमुख)
  • कोषाध्यक्ष: सुनील भुतडा
  • कार्यालय प्रमुख: डॉ. अनंत शिंदे (शिक्षक संघ आयाम प्रमुख)
  • महिला प्रमुख: शीतल भन्साळी
  • महिला सहप्रमुख: संगीता हवा
  • प्रसिद्धी प्रमुख: सुधाकर शिरसागर
  • पर्यावरण आयाम प्रमुख: पुरुषोत्तम शर्मा
  • आयटी सेल प्रमुख: निलेश कदम (सेतू आयाम प्रमुख)
  • वीज वितरण आयाम प्रमुख: बाळासाहेब धोटे
  • व्यापारी संघ आयाम प्रमुख: हरीश बियाणी
  • पेट्रोल गॅस सेवा आयाम प्रमुख: गोपाल खिराडे
  • दूरसंचार व डाक सेवा आयाम प्रमुख: गणेश राऊत
  • औषधी विक्रेता आयाम प्रमुख: गोपाल ठाकरे
  • लघुउद्योग आयाम प्रमुख: अनिल भंसाली
  • सार्वजनिक बांधकाम आयाम प्रमुख: विजयानंद मोरे
  • वैद्यकीय सेवा आयाम प्रमुख: डॉ. तुषार राठोड
  • रोजगार सृजन आयाम प्रमुख: कृष्णा बजाज
  • कृषी आयाम प्रमुख: रवींद्र इंगोले
  • विधी सेल आयाम प्रमुख: ॲड. राजेश्वर पांडे
  • मुख्य मार्गदर्शक: ॲड. सुधीर घोडचर
  • सल्लागार मंडळ: प्रा. विरेंद्रसिंह ठाकूर, उमेश नावंधर

या ऐतिहासिक प्रसंगी प्रांताध्यक्ष डॉ. मेहरे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळात ग्राहकांच्या हक्कांसाठी सक्रिय कार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुंदर आणि नेटके सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संजय राठी यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गजानन व्यवहारे यांनी केले. या वेळी अभिषेक दंडे, माधुरी राठी, वर्षा बाहेती, ज्योती भुतडा, सूरजमल तिवारी तसेच तालुक्यातील विविध ग्राहक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंगरूळपीर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments