मंगरुळनाथ :
संत सेवालाल महाराज युवा प्रतिष्ठान मंगरुळनाथच्या वतीने ग्राम सावरगाव कन्होबा येथील स्व. कृषभ चव्हाण, ग्राम इंगलवाडी येथील स्व. कृष्णा राठोड व रीसोड येथील स्व. सौरभ भिंगे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त येथील श्री साई हॉस्पिटल, महात्मा फुले चौक, बायपास रोड येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ३२ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजाला अमूल्य योगदान दिले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात अनेकांनी सहभाग घेत आपले आरोग्य तपासून घेतले.
शिबिरात डॉ. आशिष जाधव, डॉ. नम्रता राठोड यांनी मार्गदर्शन व वैद्यकीय सेवा दिल्या. जिल्हा रुग्णालय वाशिमचे सहकार्य लाभले. मित्रमंडळ तसेच संत सेवालाल महाराज युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे स्व. कृषभ चव्हाण, स्व. कृष्णा राठोड व स्व. सौरभ भिंगे यांच्या स्मृतींना अभिवादन तर झालेच, पण रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून समाजात जनजागृतीचा संदेशही पोहोचला.
वृत्त संक्रांत वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments