Ticker

6/recent/ticker-posts

भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील भयंकर वास्तव – संसदीय समितीची धक्कादायक कबुली


रुग्णांच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा, मृतांवर उपचार, अनावश्यक शस्त्रक्रिया, अंगतस्करीचे प्रकार उघड


(  पद्मभूषण अण्णा हजारे ,राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास वाशिम जिल्हा अध्यक्ष – सुधाकर चौधरी)


नवी दिल्ली / मुंबई – देशाच्या संसदीय समितीने नुकताच एक हादरवून टाकणारा अहवाल सादर केला आहे. भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार, अशी थेट कबुली यात दिली आहे. कारण स्पष्ट – रुग्णालये, डॉक्टर, विमा कंपन्या, फार्मा उद्योग, लॅब्स आणि अगदी अवयव तस्कर टोळ्यांचे जाळे मिळून रुग्णांच्या जीवाशी, पैशाशी खुलेआम खेळ खेळला जातोय.

झी न्यूजने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील तब्बल ४४% शस्त्रक्रिया बोगस किंवा अनावश्यक असतात. हृदयाच्या ५५% शस्त्रक्रिया, ४८% गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया, ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुडघा प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन – या सर्व गरज नसतानाही केल्या जातात. कारण – पैशाची भूक!


मृत रुग्णांवर उपचार – अमानुषतेचा कळस

टाइम्स ऑफ इंडियाच्या तपासणीत, मृत रुग्णांना जिवंत दाखवून महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार उघड झाले. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १४ वर्षाच्या मुलाला मृत असूनही २८ दिवस "उपचार" केले, नंतर मृत घोषित केले. कुटुंबाला पाच लाख रुपये देऊन गप्प बसवले गेले – पण मानसिक छळाची भरपाई कुणी करणार?


रेफरल व डायग्नोसिस स्कॅम – पैशासाठी रुग्णांची फसवणूक

मोठमोठ्या रुग्णालयांकडून डॉक्टरांना रुग्ण पाठवल्यास रोख रक्कम देण्याचे व्यवहार खुलेआम चालतात. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाने ठराविक संख्येने रुग्ण पाठवल्यास लाखोंची रक्कम देण्याची योजना लेखी केली होती.
बंगळुरूतील नामांकित लॅब्सवर टॅक्स विभागाच्या धाडीमध्ये शेकडो कोटींची रोख व सोने सापडले – हे डॉक्टरांना तपासण्यांचे "कमिशन" देण्यासाठी ठेवले होते.


फार्मा कंपन्यांचे हातसाखळे

देशातील २०-२५ औषध कंपन्यांकडून दरवर्षी डॉक्टरांवर हजारो कोटी रुपये खर्च होतात – "आपले औषध लिहा" म्हणून. यात परदेश दौरे, पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य, रोख रक्कम, लक्झरी भेटवस्तू – सर्व प्रकारचा लालूच दिला जातो. कोरोना काळात "डोलो" गोळी उत्पादक कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण अजूनही गाजत आहे.


अंगतस्करीचा काळा बाजार – रुग्णांच्या जीवावर सौदा

२०१९ मध्ये "इंडियन एक्सप्रेस"ने दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयाशी संबंधित प्रकरण उघड केले – कानपूरच्या महिलेचे नकळत रुग्णालयात भरती करून तिच्या अवयवांची तस्करी करण्याचा कट रचला गेला होता. पोलिस तपासात आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला, ज्यात डॉक्टर, पोलिस, वैद्यकीय स्टाफ सामील असल्याचे उघड झाले.


सरकारी योजनांचा गैरवापर – गरीबांच्या हक्काचा पैसा लुटला जातो

माजी सैनिक, अपंग, गरीब रुग्ण – किरकोळ आजार असूनही दिवसन्-दिवस भरती ठेवले जातात, खोटे कागदपत्र तयार करून लाखोंचे बिल शासनाकडून वसूल केले जाते.


नियमांची उघड उघड पायमल्ली

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार –

  • डॉक्टरने ब्रँडेड औषधाऐवजी साल्टचे नाव लिहावे,
  • उपचारापूर्वी संपूर्ण फी सांगावी,
  • रुग्णाची लेखी संमती घ्यावी,
  • रुग्णाचे रेकॉर्ड तीन वर्ष ठेवावे –
    हे सर्व नियम रोज पायदळी तुडवले जातात.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास वाशिम जिल्हा अध्यक्ष – सुधाकर चौधरी यांचा इशारा

"ही आकडेवारी फक्त बातमी नाही, हा देशाच्या आरोग्यव्यवस्थेच्या आत्म्यावरील प्रहार आहे. प्रत्येक नागरिकाने जागरूक होणे गरजेचे आहे, कारण आजची दुर्लक्ष उद्याचा जीव घेऊ शकते. पैशासाठी माणुसकी विकणाऱ्यांविरुद्ध जनतेने उठून उभे राहिले पाहिजे."


सत्यमेव जयते 🇮🇳



Post a Comment

0 Comments