पुणेच्या भूमीवर १५ ऑगस्टच्या पावन दिनी एक ऐतिहासिक क्षण घडला. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या भव्य सोहळ्यात वाशिमचा अभिमान, सिने-सृष्टीतील तेजस्वी कलाकार मा. श्री. योगेश पुरुषोत्तम राजगुरू यांना ‘महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार–२०२५’ या वैभवशाली सन्मानाने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार म्हणजे केवळ एका कलाकाराचा गौरव नव्हे, तर वाशिम जिल्ह्याच्या सांस्कृतिक व कलात्मक कर्तृत्वाचा सन्मान आहे. कला आणि सिने-इंडस्ट्री क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, प्रामाणिक मेहनत व अथक जिद्दीची दखल घेऊन राजगुरू यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला.
या सोहळ्यात माजी समाजकल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. बबनरावजी घोलप यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान झाला. समस्त प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात राजगुरूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरंगताना पाहणे, हे खरेतर समाजाच्या श्रमसंपन्न कर्तृत्वाचंच दर्शन होतं.
सन्मान स्वीकृतीनंतर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना योगेश राजगुरू म्हणाले :
“हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजाचा, सहकाऱ्यांचा आणि कलाविश्वातील साथीदारांचा हा खरा गौरव आहे. या मानामुळे नव्या उमेदीनं आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
या यशाच्या प्रवासामध्ये श्री. ज्ञानेश्वर कांबळे, श्री. राविंद्र खैरे, श्री. गजानन भटकर, श्री. समाधान माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
👉 या पुरस्काराने वाशिम जिल्ह्याच्या ओळखीत एक नवा मानबिंदू जोडला आहे. योगेश राजगुरूंच्या यशोगाथेने युवकांना दिशा मिळेल, मेहनत व कर्तृत्वाला नेहमीच योग्य सन्मान मिळतो, याचा ठोस संदेश या सोहळ्याने दिला आहे. ✨
0 Comments