पिंप्री अवगण (प्रतिनिधी):
वाशिम जिल्हा क्रीडा विभागातर्फे वाशिम येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पिंप्री अवगण येथील स्व. मधुकरराव ल. सपकाळ कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयाच्या अथर्व अतुल गिरी याने १७ वर्षे वयोगटातील एअर पिस्तूल शूटिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अथर्वच्या या उज्वल यशामुळे त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात अथर्वचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव तथा प्राचार्य प्रा. सुनिल सपकाळ, संस्थेचे अध्यक्ष सुशिल सपकाळ सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अथर्वचे क्रीडा मार्गदर्शक बळीराम राठोड सर, विशेष मार्गदर्शन करणारे चेतन वानखडे सर आदींच्या उपस्थितीत त्याचे अभिनंदन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने अथर्वला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून त्याच्याकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments