Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर नगरपरिषद निवडणूक 2025 : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मंगरूळपीर (दि.21/12/2025) :
मंगरूळपीर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी प्रक्रिया रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालय, मंगरूळपीर येथे सुरू होणार आहे. मतमोजणी सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेश–निर्गम मार्ग, वीजपुरवठा, अग्निशमन व्यवस्था व आपत्कालीन नियोजनाची तपासणी करण्यात आली आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर 10 प्रभागांतील 21 सदस्य पदांसाठी एकूण 86 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी 8 टेबल व 2 टेबलवर पोस्टल बॅलेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सज्जतेमुळे मतमोजणी प्रक्रिया वेळेत व निष्पक्षपणे पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments