Ticker

6/recent/ticker-posts

रुग्णसेवेच्या परंपरेला नवा आयाम : मंगरूळपीरमध्ये डॉ. शुभम महाकाळ यांच्या हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

डॉ. शुभम अनिल महाकाळ यांना शुभेच्छा देताना लोकनेते श्री. लक्ष्मीकांत महाकाळ साहेब

मंगरूळपीर | प्रतिनिधी
मंगरुळनाथ परिसरात रुग्णसेवेला वाहिलेल्या एका नव्या वैद्यकीय केंद्राची भर पडली असून “श्री गजानन क्लिनिक” चा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जनरल फिजीशियन व बालरोग तज्ञ डॉ. शुभम अनिल महाकाळ (B.A.M.S., M.U.H.S. नाशिक, CCH, CGO, CSVD – मुंबई, PGDCC – पुणे) यांच्या या नव्या क्लिनिकमुळे परिसरातील रुग्णांना आधुनिक व विश्वासार्ह उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आई-वडिलांच्या आशीर्वादाने व श्री गजानन महाराजांच्या कृपेने, पोस्ट ऑफिस रोडवरील बालाजी मेडिकल समोर असलेल्या 
श्री गजानन क्लिनिक चा शुभारंभ ,लोकनेते
श्री. लक्ष्मीकांत महाकाळ साहेब यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. २१ डिसेंबर २०२५) सकाळ  संपन्न झाला. यावेळी उपस्थितांसाठी तीर्थप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ. सुबोध महल्ले, डॉ. सचिन खोलगडे, डॉ. दिलीप रत्नपारखी, डॉ. नवल आसावा, डॉ. जयंत पिंपरकर तसेच डॉ. गोविंद महाकाळ यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी डॉ. शुभम महाकाळ यांच्या शैक्षणिक वाटचालीचे व सेवाभावी दृष्टिकोनाचे कौतुक करत त्यांच्या भावी वैद्यकीय सेवेस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, अनुभवी वैद्यकीय सेवा आणि आधुनिक उपचारपद्धती यांचा समन्वय साधणारे हे क्लिनिक मंगरुळनाथ व आजूबाजूच्या ग्रामीण भागासाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
या शुभप्रसंगी डॉ. अनिल महाकाळ, सौ. अनिता महाकाळ व समस्त महाकाळ परिवार यांनी उपस्थितांचे आभार मानत रुग्णसेवेस प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. “श्री गजानन क्लिनिक”च्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना परवडणारी, विश्वासार्ह आणि तत्पर वैद्यकीय सेवा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी शुभेच्छा व्यक्त करताना प्रा. उद्धव महाकाळ तसेच वाशिम खबर आवाज महाराष्ट्राची चे संपादक सुधाकर चौधरी यांनी महाकाळ कुटुंबीयांच्या रुग्णसेवेच्या परंपरेचे भरभरून कौतुक केले.
शहरातील इतर मान्यवरांनीही डॉ. अनिल महाकाळ यांच्या दीर्घकालीन सेवाभावी कार्याचा गौरव करत, डॉ. शुभम महाकाळ यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नव्या हॉस्पिटलमुळे मंगरूळपीर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
रुग्णसेवेच्या या परंपरेला नवा आयाम देत महाकाळ कुटुंबीयांनी सुरू केलेला हा वैद्यकीय प्रवास मंगरूळपीरच्या आरोग्य क्षेत्रासाठी नक्कीच आशादायी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments