मंगरूळपीर | सुधाकर चौधरी
समाजप्रबोधन, स्त्री शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लिनेस क्लब मंगरूळपीर व कायाकल्प फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर
शनिवार, दिनांक 3 जानेवारी 2026
स्थळ – ज्ञानकाशी इंग्लिश स्कूल, जांब रोड, मंगरूळपीर
वेळ – सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
येथे संपन्न होणार आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी सौ. कांता देवी डाळे रक्तपेढी, वाशिम यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार आहे.
समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तरुण, महिला, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
📞 नाव नोंदणीसाठी संपर्क :
▪️ सौ. चंचल संजय खिराडे – 9405665070 / 7020849698
▪️ सौ. राधा केदार – 8975601099
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक विचारांना अभिवादन करत,
“समाजसेवेचे ठेवूनी भान… चला करूया रक्तदान…”
हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची संधी या शिबिरातून नागरिकांना मिळणार आहे.
0 Comments