Ticker

6/recent/ticker-posts

श्रद्धा, शास्त्र आणि संस्कारांचा संगम; चेहेलची पायदळ वारी अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व


अंगारक संकष्टी चतुर्थीचा दुर्मीळ योग; चेहेलच्या नवश्या गणपती दर्शनासाठी शेकडो भाविकांची पायदळ वारी

मंगळ–चतुर्थी योगाने सिद्ध होणारी गणपती उपासना; विघ्नहर्त्याच्या चरणी भक्तीचा महापूर

मंगरुळपीर | वृत्त संकलन : सुधाकर चौधरी

दि. ६ जानेवारी २०२६, मंगळवार रोजी नवीन वर्षातील पहिलीच अंगारक संकष्टी चतुर्थी अत्यंत दुर्मीळ व पुण्यदायी योगाने साजरी होत असून, या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील नवश्या गणपती संस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून स्वयंसेवकांना सहकार्य करणे . वर्षातून क्वचित — कधी कधी एकदाच येणारी अंगारक संकष्टी चतुर्थी ही गणपती उपासनेतील अत्यंत श्रेष्ठ व फलदायी चतुर्थी मानली जाते.

शास्त्रीय व धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मशास्त्रानुसार, चतुर्थी तिथी ही गणपतीची प्रिय तिथी असून, त्यात मंगळवाराचा योग लाभल्यास ती अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. ‘अंगारक’ हे मंगळ ग्रहाचे नाव असून, स्कंदपुराण, गणेशपुराण व भविष्यपुराणात मंगळ ग्रहाने भगवान गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केल्याचा उल्लेख आढळतो.

या दिवशी —

  • उपवासपूर्वक गणपती पूजन
  • संकष्टी व्रत कथा श्रवण
  • चंद्रदर्शनानंतर उपवास सोडणे

या शास्त्रीय विधींचे पालन केल्यास विघ्न, रोग, कर्ज, मानसिक क्लेश व मंगळ दोष दूर होतो, तसेच मनोकामना पूर्ण होतात, अशी दृढ श्रद्धा आहे.


मंगरुळपीर ते चेहेल पायदळ भक्तीवारी

या पावन दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे मंगरुळपीर शहरातून शेकडो भाविक पायदळ चालत चेहेलच्या नवश्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात, उपवास व भक्तिभावाने ही पायदळ वारी निघते. अनेक भाविक नवसपूर्तीसाठी, तर काही जण कुटुंबीयांच्या सुख-समृद्धीसाठी पायदळ दर्शन घेतात.


नवश्या गणपती संस्थान – श्रद्धेचे केंद्र

मंगरुळपीर–मानोरा मार्गावरील चेहेल फाट्यावरून पूर्वेस अवघ्या ३ किमी अंतरावर असलेले नवश्या गणपती संस्थान, चेहेल हे परिसरातील श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. येथे केलेले नवस पूर्ण होतात, असा भाविकांचा अनुभव असून, अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येथे दर्शनाचे विशेष महत्त्व आहे.


विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त संस्थानच्या वतीने —

  • पहाटे महाअभिषेक
  • शास्त्रोक्त गणपती पूजन
  • संकष्टी व्रत कथा
  • सायंकाळी महाआरती
  • भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था

असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

भाविकांना आवाहन

या दुर्मीळ व पुण्यप्रद योगाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवश्या गणपती बाप्पाचे दर्शन शांताचित्ताने घ्यावे व मंदिरातील  सेवकांना भाविकांनी सहकार्य करावे  असे आवाहन नवश्या गणपती संस्थान, चेहेल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टीप :
चेहेल गाव — मंगरुळपीर ते कवठळ मानोरा रोडवर, चेहेल फाट्यावरून पूर्वेस ०३ किमी अंतरावर आहे.

विनीतः
नवश्या गणपती संस्थान, चेहेल

Post a Comment

0 Comments