एकजुटीने शहराचा विकास घडवू; राजकारणापेक्षा मंगरूळपीर महत्त्वाचा – अशोकभाऊ परळीकर
मंगरूळपीर | सुधाकर चौधरी
मंगरूळपीर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी शहरात सामाजिक, सेवाभावी व विकासाभिमुख उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ सत्कार न करता, शहरहिताचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आल्याने हा दिवस ‘विकास व सेवा संकल्प दिन’ ठरला.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर मंगरूळपीरच्या सर्वांगीण विकासासाठी आपला–परका, पक्ष–विपक्ष हे सर्व भेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांनी केले. “हेवी दावे, आरोप–प्रत्यारोप आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून मंगरूळपीरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. शहराचा नावलौकिक वाढवणारा विकासाचा इतिहास घडवायचा आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
नगराध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुख्य अभिष्टचिंतन सोहळा महात्मा फुले चौकात पार पडला.
याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी भूषविले, तर वाशिम–यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी रक्तदान करून ‘वाढदिवस म्हणजे सेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. रक्तदान शिबिरामुळे सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ देवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली ठाकूर, माजी नगराध्यक्ष चंदूभाऊ परळीकर, बिरबलनाथ संस्थांचे सचिव रामकुमार रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे वहीद शेख, उबाठाचे तालुकाध्यक्ष रामदास सुर्वे, राम ठाकरे, मित्र मंडळ, सामाजिक कार्यकर्ते ज्योतीताई ठाकरे,आशिक अली, उमेश गावंडे, संजय भोयर, यांच्यासह नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिष्टचिंतन सोहळ्यात शहरातील हजारो नागरिकांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छांचा वर्षाव करून नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांचा जाहीर सत्कार केला. विशेष म्हणजे वाशिम येथील भावसार समाजाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उबाठाचे शहराध्यक्ष सचिन परळीकर, विनोद परळीकर, मुन्ना परळीकर, पंकज परळीकर, मयूर परळीकर यांच्यासह संपूर्ण परळीकर परिवार तसेच अभिष्टचिंतन सोहळा कृती समिती मंगरूळपीर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा झालेला हा सोहळा केवळ उत्सव न राहता, विकास, सेवा आणि सामाजिक जाणीवेचा ठोस संदेश देणारा ठरला, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
0 Comments