Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; तळेगाव दाभाडेकरांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार


 “११४ कोटींची ऐतिहासिक मंजुरी!”

प्रतिनिधी – श्रावणी कामत | तळेगाव दाभाडे | दि. २८ फेब्रुवारी २०२६

तळेगाव दाभाडे शहरासाठी अत्यंत आनंदाची, अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून प्रधानमंत्री आवास योजना–शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरासाठी तब्बल ११४ कोटी रुपयांची विशेष योजना मंजूर झाली आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांचे “हक्काच्या घराचे” स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. 


दिल्लीतीलबैठकीत मंजुरी; ५२८ घरकुलांचा समावेश

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या (CSMC) सहाव्या बैठकीत देशभरातील २.८८ लाख अतिरिक्त घरांच्या बांधकामाला हिरवा कंदील देण्यात आला.

या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयात तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे ५२८ घरकुलांचा समावेश करण्यात आला असून सुमारे ११४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या मंजुरीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


निवडणुकीतीलशब्दाला न्याय

निवडणुकीच्या काळात दिलेला “हक्काचे घर” हा शब्द आमदार सुनील शेळके यांनी अल्पावधीतच प्रत्यक्षात उतरवला असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, केंद्र व राज्य शासनाशी समन्वय आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळेच ही ऐतिहासिक मंजुरी शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

पहिल्याच टप्प्यात नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठीही ही मोठी विकासाची भेट ठरली असून शहराच्या विकासात नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र आहे.


२५०० अर्ज; ५६८ लाभार्थ्यांना लाभ

शासन निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचा सर्व्हे करून दि. २६/१२/२०२५ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शहरातील साधारण २५०० नागरिकांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ५६८ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

सुमारे ४२० चौ. फुटांचे सुसज्ज घर उपलब्ध होणार असल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य नव्याने उजळणार आहे. केवळ निवारा नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे.

विकासाला नवी गती

या योजनेमुळे फक्त घरकुलच नाही, तर पायाभूत सुविधांनाही मोठी चालना मिळणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आदी सुविधांमध्ये सुधारणा होणार असल्याने शहराच्या भविष्यातील विकासाला भक्कम दिशा मिळणार आहे.

केंद्र शासन तसेच राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

तळेगाव दाभाडेकरांसाठी ही केवळ योजना नाही, तर स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे.

“आपले घर” या संकल्पनेला आता प्रत्यक्ष आकार मिळणार असून शहराच्या विकासाचा नवा पर्व सुरू झाला आहे. 

Post a Comment

0 Comments