“जनतेचा आवाज, बदलाची चाहूल — आरजे इरफान सय्यद!”
वाशिम : रेडिओच्या माध्यमातून जनसामान्यांच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सुमधूर आवाजाचे धनी आरजे इरफान सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले इरफान सय्यद हे केवळ रेडिओ जॉकी नसून समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडली आहे. रेडिओच्या प्रभावी माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या प्रशासनाच्या दारात पोहोचवल्या, तर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत समाजाशी नाळ जपली. त्यांच्या आवाजातील आत्मीयता, शब्दांतील प्रामाणिकपणा आणि समाजाविषयीची बांधिलकी यामुळे श्रोत्यांमध्ये त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा निर्माण झाला आहे.
पत्रकारितेतील त्यांच्या योगदानामुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात मदत झाली असून, तरुण पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. सामाजिक जाणिवा जपणारा आणि सकारात्मक बदलासाठी कटिबद्ध असलेला हा आवाज आगामी काळातही असाच बुलंद राहो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरजे इरफान सय्यद यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा ‘वाशिम खबर आवाज महाराष्ट्र’चे संपादक सुधाकर चौधरी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा . त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि समाजसेवेची अधिक मोठी व्याप्ती लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
0 Comments