मानोरा, दि. ५ मार्च (सुधाकर चौधरी) – सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विविध योजनांतर्गत पंचायत समिती सभागृह मानोरा येथे दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यभूत साधनांचे भव्य वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, Artificial Limbs Manufacturing Corporation of India (कानपूर व मुंबई), जिल्हा प्रशासन यवतमाळ व वाशिम तसेच Ishwar Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या वेळी खासदार Sanjay Deshmukh यांच्या हस्ते नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधव-भगिनी व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ADIP (अपंग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे) व राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) अंतर्गत विविध सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरण करण्यात आले. या वितरणातून १६२ ज्येष्ठ नागरिक आणि १६ दिव्यांग लाभार्थी असे एकूण १७८ पुरुष व महिलांनी लाभ घेतला.
या उपक्रमामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ व स्वावलंबीपणे जगण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध झाली असून लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचायत समिती मानोरा येथील गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी पंचायत समितीच्या वतीने खासदार संजयभाऊ देशमुख यांचा सर्व कर्मचारी वर्गासह सत्कार केला.
यावेळी रविंद्र पवार (तालुका प्रमुख, शिवसेना उबाठा), विजय अनंतकुमार पाटील (माजी सदस्य, पंचायत समिती मानोरा), प्रकाशभाऊ राठोड (माजी अध्यक्ष, तांडा सुधार समिती वाशिम), प्रा. राजेंद्र पाटील म्हातारमारे (नगरसेवक, नगरपंचायत मानोरा), डॉ. विठ्ठलराव घाडगे, डॉ. ओंकार राठोड, महेश पाटील राऊत (माजी उपसभापती, पंचायत समिती मानोरा), संतोष पुरी, नितीन खुपसे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
0 Comments