Ticker

6/recent/ticker-posts

तऱ्हाळा येथे MPSC-UPSC स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे लोकार्पण; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची उपस्थिती



तऱ्हाळा, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम 

 – येथील श्रीमती पंचफुलाबाई साहेबराव देशमुख स्वातंत्र्यसैनिक MPSC-UPSC स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी राम काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोन्डे, तहसीलदार रवी राठोड, तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावचे पंचायत समिती सदस्य दीपक बढेसमाधान बढे यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, संत गाडगेबाबा आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी MPSC-UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर देशमुख यांनी केले. ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही अभ्यासिका सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासिकेतून अभ्यास करून काही युवकांनी पोलीस दलात तसेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात भरती मिळविल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी पादन रस्ते, वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी सामूहिक तार कुंपण आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या संदर्भात वन अधिकारी, उपविभागीय अधिकारी व संबंधित प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.


तसेच वाशिम जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावपातळीवर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या आपदा मित्र युवक-युवतींना साहित्य किट, प्रमाणपत्र व टी-शर्टचे वाटप करण्यात आले.

स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाचा लोगो देखील यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला.

आपल्या भाषणात जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “MPSC-UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सुविधांचा योग्य वापर करून प्रशासनात स्थान मिळवावे. शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी उभे आहे.”

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अभ्यासिकेला भेट देऊन पाहणी केली व विविध बाबींची माहिती घेतली.

या कार्यक्रमाला साईनाथ क्रीडा व्यायाम व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व आपत्ती व्यवस्थापन संयोजक किशोर देशमुख यांच्यासह विनोद चाबुकस्वार, रणजित गावंडे, गजानन पोफळे, नितीन देशमुख, संतोष गावंडे, अतुल देशमुख, मदन गायकवाड, किशोर आगळे, बाळू आमटे, ईश्वर आमटे, दीपक देशमुख, राजेंद्र गावंडे, राजकुमार गावंडे, सुवर्णा बाईस्कर, रोशनी येवले, निलेश मेटकर, सागर मैसने, गणेश मैसने तसेच ग्रामपंचायत सचिव प्रमोद पिंपळकर आणि परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक, विद्यार्थी व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments