Ticker

6/recent/ticker-posts

एआय आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर जी एच रायसोनी विद्यापीठात राष्ट्रीय एफडीपी यशस्वी


फार्मेसी शिक्षणात तंत्रज्ञानाधारित बदलांवर भर; देशभरातील २०० हून अधिक शिक्षक-संशोधकांचा सहभाग

अमरावती : जी एच रायसोनी विद्यापीठ अंतर्गत फार्मेसी स्कूलच्या वतीने ‘फ्यूचर-रेडी फैकल्टी : डिजिटल ट्रांसफॉर्मेशन, एआय लिटरेसी अँड स्मार्ट कॅम्पस इकोसिस्टम्स’ या विषयावर पाच दिवसीय ऑनलाइन फैकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) उत्साहात पार पडला. ११ ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमात देशभरातील विविध फार्मेसी महाविद्यालयांतील २०० हून अधिक शिक्षक, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.

भारतीय विश्वविद्यालय संघ (एआययू) आणि विद्यापीठाच्या अकॅडेमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट सेंटर (एएडीसी) यांच्या प्रायोजकत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रायसोनी ग्रुपचे चेअरमन सुनीलजी रायसोनी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रेयस रायसोनी, कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, रजिस्ट्रार डॉ. स्नेहिल जैस्वाल आणि स्टुडंट वेलफेअर डीन डॉ. प्रशांत अवचट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

फार्मेसी स्कूलचे डीन डॉ. जे. एन. नरेंद्र शरत चंद्र यांनी कार्यक्रम संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच डॉ. सुहास धसवडिकर, डॉ. विवेक पेटे, डॉ. सचिन पडोले आणि डॉ. बी. व्ही. नागार्जुन यादव यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले.

उद्घाटन सत्रात डॉ. नरेंद्र शरत चंद्र यांनी फार्मास्युटिकल शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकीकरणाची गरज अधोरेखित केली. शिक्षकांनी एआय साक्षरता विकसित करून तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धती आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनपर मुख्य भाषण डॉ. सत्येंद्र प्रसाद यांनी केले. त्यांनी औषध संशोधन, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक नवकल्पनांमध्ये एआयची वाढती भूमिका स्पष्ट करताना एआयच्या नैतिक आणि जबाबदार वापरावर भर दिला.

कार्यक्रमात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथील डॉ. सतीश पोलशेट्टीवार, आयआयटी गुवाहाटी येथील डॉ. बिप्लब बोस, तसेच एनएमआयएमएस येथील डॉ. महेश पालकर यांच्यासह अनेक नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. एआय आधारित औषध शोध, डिजिटल पेडागॉजी, साहित्य समीक्षा, शैक्षणिक लेखन, स्मार्ट कॅम्पस इकोसिस्टम आणि भविष्योन्मुखी शिक्षण पद्धती यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

सत्रांदरम्यान सहभागी शिक्षकांना एआय टूल्स, डेटा अॅनालिटिक्स, व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म्स आणि सिम्युलेशन तंत्रज्ञानाचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. नैतिक एआय वापर, शैक्षणिक अखंडता, डिजिटल परिवर्तन आणि आउटकम-बेस्ड शिक्षण या विषयांवरही विचारमंथन झाले.

समारोप सत्रात डॉ. स्नेहिल जैस्वाल यांनी या एफडीपीमुळे शिक्षकांना भावी शैक्षणिक आव्हानांसाठी तयार होण्यास आणि तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक वातावरण विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. सहभागी शिक्षकांनी कार्यक्रमातील सत्रांची उपयुक्तता आणि व्यावहारिक ज्ञानाची प्रशंसा केली. या उपक्रमामुळे फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रातील शिक्षकांमध्ये डिजिटल परिवर्तन, एआय साक्षरता आणि स्मार्ट शिक्षण पद्धतींबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments