मुंबई : Vidarbha मध्ये उष्णतेची तीव्र लाट आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अनेक भागांत तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ते ४१ ते ४३ अंशांदरम्यान राहू शकते. उष्णतेमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही त्रस्त झाला आहे. दरम्यान, काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
प्रशांत महासागरात ‘अल निनो’ची प्रक्रिया सक्रिय होत असल्याने याचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर दिसून येत आहे. Sri Lanka येथे पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासाला सध्या खीळ बसली असून, Kerala मध्ये मान्सूनचे आगमन ३० मेनंतर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, तसेच जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मान्सून उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन खरीप पेरणीबाबत घाई न करता हवामानाचा अंदाज पाहूनच नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सून अपडेट
◼️ प्रशांत महासागरात ‘अल निनो’ची प्रक्रिया सक्रिय
◼️ श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून सध्या स्थिर
◼️ केरळमध्ये मान्सून आगमनास विलंबाची शक्यता
◼️ ३० मेनंतर मान्सून पुढे सरकण्याचा अंदाज
◼️ विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम
◼️ काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता
0 Comments